परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:17 PM2017-12-31T23:17:42+5:302017-12-31T23:17:51+5:30

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती.

Locked open traffic from Sunday in Parli | परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

googlenewsNext
ठळक मुद्देदाऊतपूर - टोकवाडी बंधा-यातून राख उचलण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने औष्णिक विद्युत मुख्य अभियंत्यांना वाहतूक व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही राख तळ्यातून राख उचलणे बंद केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून होणाºया राखेच्या थराचे प्रदूषण थांबले आहे.

परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहारी वडगाव, संगम परिसरातील परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी लागणाºया दगडी कोळशाच्या वापर केला जातो. कोळसा जळाल्यानंतर ही राख पाईपद्वारे राख तळ्यात सोडली जाते. त्या राखेचा उपयोग वीटभट्टीसाठी केला जातो. त्या राखेची वाहतूक १०० ट्रॅक्टर, २०० टिप्पर व ५० ट्रकद्वारे तळ्यातून वाहतूक केली जाते.

राखेची ही वाहतूक व्यवस्थित केली जात नसल्याने रस्त्यावरच राख सांडली जाते. ही राख हवेने उडून इतर वाहनांना अडचणीचे ठरत असून, अपघाताची भीती वाढली आहे. धर्मापुरी फाटा ते दादाहारी वडगाव या रस्त्यावर तर दिवसाही राख सांडलेली असते. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे दादाहारी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे म्हणाले.

शनिवारी कन्हेरवाडीच्या रस्त्यावर राख सांडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडगे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांना राखेच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारपासून तळ्यातील राख जेसीबीने उचलणे थांबविले आहे.

बीडसह तीन जिल्ह्यात राखेची वाहतूक
ही राख लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नेकनूर, केज, अंबाजोगाई, बीड, माजलगाव, पैठण आदी भागांसह अन्य शहरातील वीट उत्पादकांना पुरविली जाते. राखेच्या वाहनांवर आच्छादन न टाकता उघड्या वाहनातून शहरातील विविध मार्गांवरून वाहतूक केली जात असल्याने परळीकरही हैराण आहेत.

Web Title: Locked open traffic from Sunday in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.