औरंगपूरच्या प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:29 AM2019-02-24T00:29:04+5:302019-02-24T00:30:04+5:30
सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते.
सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते.
सिरसाळ्यापासून काही अंतरावर औरंगपूर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या या शाळेत एकूण २५ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. या शाळेचा पूर्ण कारभार सिरसाळा केंद्रातून चालतो. दोन शिक्षिकांची नियुक्ती असणाºया या शाळेवर नियमितपणे कोणीच येत नाही. नेहमीच्या दांडी सत्रामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब ग्रामस्थांनी वरिष्ठांपर्यंत कळवूनही कोणतीच कारवाई झाली नाही. यातच एका शिक्षिकेच्या मुलीची परीक्षा असल्याने त्यांनी यापूर्वीच एका महिन्याची रजा घेतली आहे. दुसºया शिक्षिका सिरसाळ्यात असूनही शाळेवर गेल्या नाहीत. अखेर सरपंच अश्विनी कांबळे, उपसरपंच भास्कर देवकते, शालेय समिती अध्यक्ष शेषेराव दराडे, राधाकिशन दराडे, बंडू लहाने, शिवाजी कांबळे, रोहिदास देवकते आदींनी एकत्र येऊन शनिवारी शाळेस कुलूप ठोकले.
नियमित शाळेत शिक्षक येत नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे सरपंच अश्विनी कांबळे यांच्यासह आंदोलनकर्ते ग्रामस्थ म्हणाले.