लोकअदालतचे मोठे पाऊल; ८५ वर्षीय वृद्ध महिलेस जागेवर जाऊन दिला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 06:56 PM2023-12-09T18:56:51+5:302023-12-09T18:57:18+5:30

माजलगाव दिवाणी न्यायालयाचा लोकन्यालयात तडजोडीतून दिला न्याय

Lok Adalat's Big Step; An 85-year-old woman was given justice on the spot | लोकअदालतचे मोठे पाऊल; ८५ वर्षीय वृद्ध महिलेस जागेवर जाऊन दिला न्याय

लोकअदालतचे मोठे पाऊल; ८५ वर्षीय वृद्ध महिलेस जागेवर जाऊन दिला न्याय

माजलगाव (बीड) : माजलगाव न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरण निकाली निघाले. यामध्ये न्यायालयाबाहेर बसलेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेस न्यायमूर्ती यांनी जागेवर जाऊन तडजोडीतून वाटणी पत्र करून दिले.

आज माजलगाव न्यायालयात लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक प्रकरण तडजोडीतून निकाली काढण्यात आली. यावेळी धारूर तालुक्यातील गांजपूर येथील एक प्रकरण होते. उत्तम रामचंद्र सिरसाट व सुरेश रामचंद्र सिरसाट या दोन्ही भावात सर्हे नंबर ४८ आ व ४९ आ या जमिनीचा तथाकथित खरेदीखत रद्द करून अवैध असल्याचे घोषित करणे तथा मनाई हुकूम मिळण्यासाठी दावा करण्यात आला होता.हे प्रकरण प्रलंबित असल्याने न्यायालयाने लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवले होते. 

न्यायालयाने दोन्ही भावांमध्ये समेट घडवून आणली. यावेळी उत्तम व सुरेश यांची आई ८५ वर्षीय सावित्रा रामचंद्र सिरसाट दुर्धर आजारी असल्याने त्या न्यायालय परिसरात येऊन एका झाडाखाली बसल्या होत्या. त्यांना न्यायालयात येणे शक्य नसल्यामुळे येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती एस.डी.घनवट यांनी बाहेर येत त्यांचा जबाब घेत प्रकरण तडजोडीतून निकाली काढले. न्यायपूर्ती यांनी वृद्ध महिलेस जागेवर जाऊन न्याय दिल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी अ.जिल्हा सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस.एम हे उपस्थित होते.तर वरिष्ठ लिपिक जी.जी. गरूड, एन. एस. होके यांच्यासह सावित्रीबाई सिरसाट यांच्या वतीने अॅड ए.एम.कुलकर्णी व अॅड हजी सय्यद नित्रुडकर यांनी तर प्रतिवादीकडुन अॅड एस.एस.देशपांडे यांनी काम पाहिले.

Web Title: Lok Adalat's Big Step; An 85-year-old woman was given justice on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.