Lok Sabha Election 2019 : बीड मतदारसंघात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 07:04 PM2019-03-30T19:04:28+5:302019-03-30T19:05:00+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली.
बीड : सर्वाधिक ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली.
३६ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्षाचे २, नोंदणीकृत पक्षाचे ८ आणि २६ अपक्षांचा समावेश आहे.या ३६ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम गोपीनाथराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव, समाजवादी पार्टीचे सय्यद मुजम्मील सय्यद जमील, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे चंद्रप्रकाश शिंदे, हम भारतीय पार्टीचे अशोक थोरात, बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टीचे सादेक मुनीरोद्दीन शेख, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे कल्याण गुरव, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दलचे रमेश गव्हाणे आणि महाराष्ट्र क्रांतिसेनेचे गणेश करांडे यांचा समावेश आहे.
२६ अपक्ष उमेदवारांमध्ये कालीदास आपेट, यशश्री प्रमोद पाटील, अॅड. शरद कांबळे, नीलेश जगताप, साजन रईस चौधरी, मुजीब नईमोद्दीन इनामदार, शेख यासेद शेख तय्यब, सय्यद मिनहाज जुबेर मुन्शी कुरेशी, पठाण सरफराज खान मेहताब खान, चव्हाण संपत, अन्वर खान मिर्झा खान, पंडित दामोदर खांडे, खान मजहर हबीब, शेख सादेक शेख इब्राहीम, बजरंग दिगंबर सोनवणे, गालेब खान जब्बार खान पठाण, पठाण मुसाखान युनूस खान, तुकाराम व्यंकटी चाटे, जमीर बशीर शेख, निसार अहमद, राजेशकुमार अण्णासाहेब भडगळे, कोळेकर गणेश भाऊसाहेब, शिवाजी नारायणराव कवठेकर, विजय रंगनाथ साळवे, वीर शेषेराव चोखोबा यांचा समावेश आहे. या मतदारसंघात ५८ उमेदवारांनी ७९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती छाननीनंतर ५३ उमेदवार रिंगणात उरले होते.