गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:09 AM2019-12-12T00:09:46+5:302019-12-12T00:10:18+5:30

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहेत.

Look at the rally at Gopinath Fort | गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे लक्ष

गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देलोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती : पंकजा मुंडेंच्या भाषणाबद्दल उत्सुकता

परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहेत. दरम्यान माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने राज्याचे लक्ष लागले आहे. यावेळी गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी भाजप, शिवसेनेचे नेते येणार असल्याचे सांगण्यात आले.
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे बुधवारी दुपारी हेलिकॉप्टरने गोपीनाथगड येथे आगमन झाले. त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. तेथून परळीतील यशश्री बंगल्याकडे आल्या. परळी विधानसभा मतदार संघाचा निकाल घोषित झाल्यानंतर पंकजा मुंडे मुंबईला गेल्या होत्या. त्यानंतर प्रथमच त्या परळीत आल्या. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गोपीनाथ गडावर बुधवारी पोलीस बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी तुम्ही सारे या...हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे...मी वाट पाहते असे पोस्ट करुन कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले आहे.
गोपीनाथ गडावर जय्यत तयारी
गोपीनाथ गडावर गोपीनाथराव मुंडेंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते, भक्त, चाहते हे परळीकडे निघाले आहेत. समाधी स्थळाच्या दर्शनासाठी येथे नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने गोपीनाथ गडावर जय्यत तयारी केली आहे.
जयंती निमित्त विनम्र अभिवादानाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. या बॅनरवर गोपीनाथराव मुंडे, पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे फोटो आहेत.
गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी नाथरा तर कर्मभूमी परळी आहे. ६ वर्षापुर्वी गोपीनाथराव मुंडे यांचे अचानक निधन झाले. त्यानंतरही माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे भगिनींनी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्य सुरूच ठेवले आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्य, त्यांच्या विचाराची प्रेरणा व उर्जा भावी पिढीला मिळावी म्हणून वैद्यनाथ कारखाना परिसरात १२ डिसेंबर २०१४ रोजी गोपीनाथ गडाचे भूमिपूजन झाले तर १२ डिसेंबर २०१५ रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले होते.

Web Title: Look at the rally at Gopinath Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.