कानडीत सोयाबीनच्या गंजी जळून चार लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:51 AM2018-02-05T00:51:00+5:302018-02-05T00:51:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : येथून दोन किमी अंतरावरील कानडी रोडवरील शेतात रचून ठेवलेल्या सात गंजीला आग लागून झालेल्या ...

The loss of four lakh rupees by burning soya beans | कानडीत सोयाबीनच्या गंजी जळून चार लाख रुपयांचे नुकसान

कानडीत सोयाबीनच्या गंजी जळून चार लाख रुपयांचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : येथून दोन किमी अंतरावरील कानडी रोडवरील शेतात रचून ठेवलेल्या सात गंजीला आग लागून झालेल्या नुकसानीत अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
कानडी रोडवरील श्रीहरी कमलाकर टांक साळे, प्रमोद कमलाकर टाकसाळे, राजेंद्र कमलाकर टाकसाळे, मयूर मधुकर टाकसाळे, विनोद चंद्रकांत टाकसाळे, किसन महादू गवळी आणि बाळासाहेब श्रीपती वाघमारे या सात शेतक-यांनी शेतातील सोयाबीन काढून गंजी लावून ठेवल्या होत्या. पूर्णपणे वाळल्यानंतर मळणी करण्याचे ठरवले होते. मात्र, शनिवारी रात्री नऊ वाजता गंजीला आग लागली. संबंधित शेतकरी घरी असल्याने ही घटना लवकर लक्षात आली नाही. ती दूरवर पसरत गेली. आग लागल्याचे माहित झाल्यानंतर शेतकºयांनी शेताकडे धाव घेत व मदतीला इतरांना बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र जवळपास पाण्याची व्यवस्था नसल्याने आग नियंत्रणात येत नव्हती.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. मात्र, सदरील गाडी घटनास्थळापासून काही अंतरावर आल्यानंतर बॅटरीचा बिघाड होऊन अचानक बंद पडून अडकून पडली. नंतर गाडीला ट्रॅक्टरने धक्का मारून चालू करेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग विझवण्यासाठी शहरातील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: The loss of four lakh rupees by burning soya beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.