लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी; शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:49 AM2018-02-13T00:49:57+5:302018-02-13T00:50:29+5:30
रविवारी बीड तालुक्यातील पिंपळनेर, ढेकणमोहा, वांगी, शिवणी परिसरात सोम्य गारपीट झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे पोहचला आहे. परंतू यात बीड तालुक्याचा उल्लेख नसल्याची माहिती आहे. या संदर्भात संपर्क साधला असता बीड तालुक्यातील पाली व पिंळनेर मंडळात अल्प प्रमाणात गारपीट झाली. परंतू पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिल्याचे बीड तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रविवारी बीड तालुक्यातील पिंपळनेर, ढेकणमोहा, वांगी, शिवणी परिसरात सोम्य गारपीट झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे पोहचला आहे. परंतू यात बीड तालुक्याचा उल्लेख नसल्याची माहिती आहे. या संदर्भात संपर्क साधला असता बीड तालुक्यातील पाली व पिंळनेर मंडळात अल्प प्रमाणात गारपीट झाली. परंतू पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिल्याचे बीड तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.
दरम्यान वांगी येथील प्रगतशील शेतकरी जीवनराव बजगुडे यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणाले, मोठे नुकसान झाले नसलेतरी गहू ओंब्यात आहे. आंब्याला बारीक फळे लागली आहेत. गारपीटीचा परिणाम पिकांवर होणारच आहे. या परिसरात आंब्याचा मोहोर आधीच करपला होता. नंतर बहरलेला मोहोर आता कळून पडत असल्याचे बजगुडे म्हणाले.
पंचनामे सुरु
बीड जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २६ हजार ५८० एकरातील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निर्णयानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले.
गारपीट नुकसानीचे पंचनामे करावेत
बीड : शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी जिल्हाधिकारी श्री. एम.डी. सिंह यांची भेट घेवुन गारपीट झालेल्या भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली आहे. बीड, गेवराई, माजलगाव, शिरूर का. या तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामधील उभे पिक गहु, हरभरा, ज्वारी तर पपई, मोसंबी, आंबा या सारख्या फळपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्या काही तासातच गारांच्या फटकयामुळे रब्बी पिके आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ.मेटे यांनी केली आहे.
अंबाजोगाईत उभी पिके झाली आडवी
अंबाजोगाई : सर्वत्र सुरू असलेल्या गारपिटीचा तडाखा मध्यरात्रीनंतर झालेल्या गारांच्या पावसाने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना बसला. तर सुसाट वाºयामुळे ज्वारी, गहू व हरभºयाची पिके आडवी झाली आहेत. काढून ठेवलेले हरभºयाचे ढिगारे पावसामुळे मोठ्या प्रमाणात भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यात रविवारी रात्री राडी, मुडेगाव, धानोरा, अकोला, तडोळा, राडी-तांडा, अंजनपूर, कोपरा या परिसरात गारांचा पाऊस झाला. या गारपिटीमुळे व सुसाट वाºयामुळे शेतात उभी असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, करडई, ही पिके मोठ्या प्रमाणात आडवी पडली. तर अनेक शेतक-यांनी हरभ-याची काढणी करून ठेवली होती. अनेकांचे ढिगारे सुसाट वा-यामुळे उडून गेले तर पावसात ढिगारे भिजल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे.
खासदारांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी
गेवराई : निसर्गाच्या कोपाने पुन्हा एकदा शेतकºयांना अडचणीत आणले आहे. तरी आलेल्या सकंटाला तोड देणा-या शेतक-यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ज्या शेतकºयांनी पीक विमा भरणा केला नसेल त्यांनी घाबरु नये. कारण पीक विमा भरला नसलेल्या शेतक-यांना सुध्दा नुकसान भरपाई मिळेल, असे खा. प्रीतम मुंडे यांनी खळेगाव येथे पडझड झालेल्या घराची व पिकाची पाहणी करताना सांगीतले. अचानक झालेल्या गारपिठीने तालुक्यातील पडझडीच्या घराची व पिकांची नासाडी झालेली असून शेतकºयांवर संकट आले आहे. त्यामुळे गारपीट झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी बीडच्या खा. प्रीतम मुंडे यांनी सोमवारी सकाळी ९ वाजता तालुक्यातील खळेगाव येथील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आ. लक्ष्मण पवार, विजय गोल्हार, प्रकाश सुरवसे, संतोष हंगे, नगराध्यक्ष सुशील जंवजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी, राजेंद्र आर्दड, कृष्णा काकडे, राम पवार, आप्पासाहेब कानगुडे, प्रल्हाद येळापुरे, संजय आंधळे, नायब तहसीलदार, कृषी सहाय्यक, तलाठी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.