बंकटस्वामींच्या पुण्यतिथीला लोटला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:04 AM2019-05-20T00:04:40+5:302019-05-20T00:05:18+5:30

वारकरी संप्रदायातिल भक्ती सूर्य महान संत वै बंकटस्वामी महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रमाची रविवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली.

Lotus Jansagar in the death of Bankashwami | बंकटस्वामींच्या पुण्यतिथीला लोटला जनसागर

बंकटस्वामींच्या पुण्यतिथीला लोटला जनसागर

googlenewsNext
ठळक मुद्देकाल्याच्या कीर्तनाने सांगता : वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीत बंकटस्वामी महाराजांचे विशेष योगदान - संदीपान हसेगावकर

नेकनूर : वारकरी संप्रदायातिल भक्ती सूर्य महान संत वै बंकटस्वामी महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रमाची रविवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली. सकाळी समाधी अभिषेक करण्यात आला तर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ज्ञानसिंधू संदीपान महाराज शिंदे हसेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.
यावेळी प्रमुख संत मंडळी संस्थानचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, हरिहर भारती महाराज, विनायक महाराज काचगुंडे, ज्ञानेश्वर माऊली मंझरीकर, रामहरी महाराज डंबरे, नवनाथ महाराज जरुड, वैजीनाथ महाराज नांदूर, मारुती महाराज चोरमले, भागवत महाराज पानसरे, परशुराम महाराज मराडे यांचा समावेश आहे.
राजकीय उपस्थितीत आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, रमेश पोकळे, काँग्रेस प्रवक्ते रवींद्र दळवी, अक्षय मुंदडा, रवींद्र क्षीरसागर, अंजली घाडगे, संतोष हांगे, अशोक लोढा, अरुण डाके, दिलीप गोरे, भारत काळे यांच्यासह बंकटस्वामी संस्थानचे सर्व विश्वस्त उत्सव कमेटी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. सात दिवस महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकराची कीर्तने झाली. काल्याचे कीर्तन संदीपान महाराज यांचे झाले. ‘अवघेची गोड झाले। मागीली ये भरी आले ॥ साह्य झाला पांडुरंग। दिला अभ्यतरी संग॥ थंडीये पहाता तो वाव । मागे पाहतावो ठाव ॥ तुका म्हणे दिली। स्वप्नी चे जागे झाले ।’ या तुकाराम महाराज यांच्या अभंगांवर चिंतन मांडले. यावेळी श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या चरित्रातील काही आठवणी सांगितल्या. वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये बंकटस्वामी महाराज यांच्या विशेष योगदान असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वामी महाराज हे मोठे अभ्यासक होते. पायी चालताना ज्ञानेश्वरी सांगत होते. त्यांचे वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार आहेत. ग्रामीण भागात खूप मोठे काम स्वामींनी केले. कीर्तनात अभंग निरूपण पध्दत विकसित केली. त्या स्वामींचे खूप मोठे आशीर्वाद आहेत, असेही महाराजांनी सांगितले.
सर्व मान्यवरांचे आभार संस्थानतर्फे मानण्यात आले . श्री गुरु बंकट स्वामी महराज यांची फडावरील सर्व गुणवान पैकी नाना महाराज कदम, सत्यवान महाराज लाटे , सुरेश महाराज जाधव, अभिमान महराज, अच्युत महाराज घोडके, ओंकार महाराज, मंगेश महाराज, रामेश्वर महाराज दराडे रंजित महाराज शिंदे, अंकुश महाराज, अनिल महराज, मंगेश महाराज, दिनेश महाराज, जनार्दन महराज बांगर, अर्जुन महाराज, वसंत महाराज आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने भाविक व टाळकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Web Title: Lotus Jansagar in the death of Bankashwami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.