प्रेमच बनले वैरी, जेवणावरून वाद झाल्याने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:56 AM2022-09-19T11:56:27+5:302022-09-19T11:57:00+5:30

घरातील स्टोव्हचे इंधन संपल्याने महिलेने स्वयंपाक केला नव्हता, यावरून झाला वाद

Love became enemy, a woman living in a live-in was set on fire due to an argument over food | प्रेमच बनले वैरी, जेवणावरून वाद झाल्याने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस पेटविले

प्रेमच बनले वैरी, जेवणावरून वाद झाल्याने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस पेटविले

googlenewsNext

वडवणी : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस जोडीदाराने डिझेल टाकून पेटविले. यात महिला गंभीररीत्या भाजली असून उपचार सुरू आहेत. ही घटना १५ सप्टेंबर रोजी येथे घडली. जोडीदारावर वडवणी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद असून, तो फरार आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील एका २२ वर्षीय महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. सहा महिन्यांपासून ती बळिराम राजाभाऊ इचके (रा. उपळी ता. वडवणी) याच्याशी लिव्ह इनमध्ये असून, १५ सप्टेंबर रोजी घरातील स्टोव्हचे इंधन संपल्याने महिलेने स्वयंपाक केला नव्हता. डिझेल आणण्यावरून तिचे बळिरामशी कडाक्याचे भांडण झाले. डिझेल आणल्यावर रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर ते टाकून काडीपेटीने पेटवून दिले. यात ती ६३ टक्के भाजली असून, जिल्हा रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तिच्या जबाबावरून पेठ बीड ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली.

Web Title: Love became enemy, a woman living in a live-in was set on fire due to an argument over food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.