कमी दाबाने वीज, शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:41+5:302021-04-26T04:30:41+5:30
कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील ...
कोंडवाडा
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत चालला आहे, तरीही या भरधाव वाहनधारकांना पोलिसांकडून गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन, कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
स्वच्छता होईना
माजलगाव : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून, न. प.ने स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता; मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
काटेरी झुडपांचा त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
सिग्नल सुरू करा