लेकींनीच मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:12 AM2019-05-29T00:12:28+5:302019-05-29T00:13:00+5:30
इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
बारावी परीक्षेसाठी ३७ हजार ८९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २३ हजार ८१५ मुलांचा तर १३ हजार ९८० मुलींचा समावेश होता. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिनही शाखांमधून एकूण २३३१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. २० हजार १७६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १० हजार ६९० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण ग्रेडमध्ये १६६ असे एकूण ३३ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.२७ टक्के इतका लागला असून विभागात दुसºया स्थानी आहे.
कला शाखेचा निकाल ७९.७० टक्के
बारावी परीक्षेत जिल्ह्यातून कला शाखेतील १४ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ५२० विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७ हजार ४५३, द्वितीय ३ हजार ६५२ पास ग्रेडमध्ये ५२ असे ११ हजार ६७७ विद्यार्थी पास झाले. या शाखेचा निकाल ७९.७० टक्के लागला.
तालुकानिहाय टक्केवारीं;
केज तालुका अव्वल
बीड ९२.३७, पाटोदा ९०.५०, आष्टी ८६.९१, माजलगाव ८०.६७, अंबाजोगाई ८१.४६, केज ९३.८२, परळी ७९.५१, धारुर ८५.०२, शिरुर ९१.३६, वडवणी ९१.७१
व्होकेशनलचा ७८.३३ टक्के निकाल
व्होकेशनल शाखेतून १४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ६४ विद्यार्थी विशेष प्राविण्याने पास झाले.८०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २८७ विद्यार्थी द्वितीय] ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा निकाल७८.३३टक्के लागला.
विज्ञान शाखेचा निकाल जास्त
बीड जिल्ह्यात विज्ञान शाखेतून नोंदीत १९ हजार २५२ पैकी १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४३७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले.
या शाखेत प्रथम श्रेणीत १० हजार ७८४, द्वितीय श्रेणीत ५ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास ग्रेडमध्ये ९० असे १८ हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९५.२१ टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखा ९१ %
जिल्ह्यातील २४५२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून परीक्षा दिली. यात ३१० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
प्रथम श्रेणीत ११३७, द्वितीय श्रेणीत ७६३, पास ग्रेडमध्ये २४ असे २२३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९१.११ टक्के इतका लागला आहे.