‘टास्क’मध्ये नफ्याचे आमिष, व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा
By शिरीष शिंदे | Published: June 23, 2024 09:28 PM2024-06-23T21:28:46+5:302024-06-23T21:29:09+5:30
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
शिरीष शिंदे, बीड : एका व्यापाऱ्याला टेलिग्राम ॲपवर टास्क म्हणजेच ऑनलाइन पद्धतीचे एक-दोन मिनिटांचे काम देऊन वेळोवेळी पैशांची मागणी करून ८ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
राजी कायल व साहिल बन्सल यांनी बीड येथील व्यापारी अनिल फुलचंद बिराजदार यांना टेलिग्राम या मोबाइल ॲपवर प्रति टास्क ५० रुपयांचे आमिष दाखवले. तसेच वेळोवेळी पैशांची मागणी करून एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी राजी कायल व साहिल बन्सल तसेच टेलिग्राम लिंकधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक डी.बी. गात करत आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात आता पर्यंत अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल झाले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित खाते होल्ड करुन तक्रारदारांना त्यांचे पैसे परत देण्याचा प्रयत्न बीड पोलिसांकडून केला जातो.