माफियांवर कारवाई; ५४ लाखांच्या मुद्देमालासह वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:01 AM2019-01-23T00:01:55+5:302019-01-23T00:03:09+5:30
तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गेवराई : तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरीत्या वाळू तस्करी चालू असल्याची माहिती नायब तहसीलदार अभय जोशी, प्रशांत जाधवर यांना मिळाली. त्यानुसार १९ व २२ जानेवारी रोजी महसूल पथकाने बागपिंपळगाव, पाडळसिंगी येथील टोल नाका ठिकाणी व गेवराई बायपास रोडवर सापळला रचून वाळू तस्करी करणारे तीन टिप्पर (क्र .एमएच २३/एयु१३५९, एमएच०४/एफ९४३४ तर टॅक्टर क्र . एमएच २३/बी ७३८८) ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या वाहनांवर अंदाजे ७ लाख ९९ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला असून, वाहनासह अंदाजे ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई नायब तहसीलदार अभय जोशी, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलाठी जितेंद्र लेंडळ, कमलेश सुरावर, काशीद, केरु लकर, ससाने, निशांत ठाकुर, सुनील तांबारे आदींनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
राजापूरजवळ वाळूचा ट्रॅक्टर पकडला
तलवाडा : गेवराई तालुक्यातील राजापूर व गंगावाडी या गावांच्या परिसरातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल कर्मचाºयांनी पकडला. मंगळवारी तलाठी आंधळे व डोफे यांनी ही कारवाई केली.
अनेक दिवसांपासुन या गावातून होत असलेला वाळू ऊपसा पात्रात पाणी आल्याने, बंद होता मात्र काही दिवसांपासून वाळू उपसा परत सुरु झाला. बुधवारी गंगावाडी व राजापूर हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तलाठी आंधळे व डोफे यांच्या निदर्शनास आला.त्यावर त्यांनी तो ट्रॅक्टर पकडून तहसीलला लावला आहे. या कारवाईमुळे वाळु माफियांचे धाबे दणाणले आहे. तलाठी आंधळे यांनी काही दिवसांपुर्वीच राजापुर सज्जाचा पदभार घेतला असुन तात्काळ झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळु ऊपश्यावर नियंञण येण्यास मदत होणार आहे.