हिंजवडीतील अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत निघाला महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:48 PM2018-10-04T17:48:41+5:302018-10-04T17:51:37+5:30

सतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा निषेधार्थ आज शहरात महामोर्चा काढण्यात आला.

Mahamorcha against Hinjewadi rape case at Ambajogai | हिंजवडीतील अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत निघाला महामोर्चा

हिंजवडीतील अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत निघाला महामोर्चा

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : कासारसाई-हिंजवडी ( ता.मावळ जि.पुणे ) येथील ऊसतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा निषेधार्थ आज दुपारी शहरात महामोर्चा काढण्यात आला. महामोर्चासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी-कर्मचारी व  शाळा,महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. 

यावेळी शिवाजी चौकात व उपविभागिय कार्यालयासमोर पथनाट्य सादर करून निदर्शने करण्यात आली. आकांक्षा नवले पाटील व अमृता धानोरकर या मुलींनी महामोर्चास संबोधित केले. महामोर्चात सहभागी सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कृती समितीने केली होती. तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यास मोठी मदत केली.अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासारसाई-हिंजवडी, ता.मावळ जि.पुणे येथील ऊसतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवून अत्याचार करणा-या नराधमास कडक शासन करून त्यांना फाशी देण्यात यावी. 1) सदरचा खटला जलदगती कोर्टात चालवणे. 2) सदरच्या खटल्यातील आरोपींना फाशी देवून कडक शासन करावे. 3) पिडित कुटूंबाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेवून त्यांना संरक्षण द्यावे. 4) पिडित कुटूंबास अर्थसहाय्य देण्यात यावे. 5) पिडित कुटूंबाचे पुनर्वसन करून सामाजिक बांधिलकी जपावी. 6) सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.या मागण्या मान्य करून पिडितेस न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, अंबाजोगाईचे अनंतराव घुले, गोविंद इप्पर, प्रा.नारायण सिरसाट, अनिरूध्द फड, सुधीर माले, दिनेश कराड, विजय चाटे, स्वप्निल बडे, श्रीकांत नागरगोजे, अॅड.सचिन शेप, अॅड.अशोक मुंडे, अविनाश गित्ते आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

मोर्चात विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीनी, युवती, युवक यांचा मोठ्याप्रमाणावर सहभाग होता. यासोबतच नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक संजय गंभिरे, प्रा.अरूंधती पाटील, बालासाहेब शेप, संतोष काळे, अनंतराव घुले, विजय अंजाण, सचिन केंद्रे, वैजेनाथ देशमुख, प्रा.रमा पांडे, संध्या आरबाड आदींनी सहभाग घेतला. 

Web Title: Mahamorcha against Hinjewadi rape case at Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.