महाशिवरात्र सोहळ्याचा महाप्रसाद घरपोहोच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:00 AM2021-03-13T05:00:53+5:302021-03-13T05:00:53+5:30

शिरूर कासार : संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेल्या महाशिवरात्र सोहळ्याची ४३ वर्षांपासूनची परंपरा खंडित न होऊ ...

Mahaprasad of Mahashivaratra ceremony will reach home | महाशिवरात्र सोहळ्याचा महाप्रसाद घरपोहोच करणार

महाशिवरात्र सोहळ्याचा महाप्रसाद घरपोहोच करणार

Next

शिरूर कासार : संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेल्या महाशिवरात्र सोहळ्याची ४३ वर्षांपासूनची परंपरा खंडित न होऊ देता मोजक्याच भाविकांनी ही परंपरा जतन केली. शुक्रवारी विद्यमान महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी काल्याचे कीर्तन अवघ्या अर्ध्या तासात उरकले व दहीहंडी फोडून काला झाला. तसेच महाप्रसादासाठी बसणारी महापंगत स्थगित करून प्रसाद थेट घरपोच करण्याचा निर्णय सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी जाहीर केला. शिरूरसह संस्थानला जोडली गेलेल्या वीस गावातसुद्धा हा प्रसाद पोहच केला जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी कपिलेश्वर मंदिराचे स्वामी महाराज, चंद्रकांत महाराज, संभाजी महाराज, संदीप महाराज शेवाळे, महेंद्र महाराज यांच्यासह श्रीक्षेत्र भगवानगडाचे साधक उपस्थित होते. या सप्ताहाचे २०३४ सालापर्यंतचे महाप्रसाद श्रीफळ देण्यात आलेले आहेत. यावर्षी दिंडी प्रदक्षिणेलाही फाटा देण्यात आला. रांगोळी, महंतांचे पाद्यपूजन, सवाद्य मिरवणूक आणि टाळमृदंगाचा गजर यंदा अनुभवायला मिळाला नाही. शिरूरसह दहीवंडी, झापेवाडी, कान्होबाची वाडी, कोळवाडी, भालगाव, आनंदगाव, पाडळी, बावी, तागडगाव, नागरे वाडी, वार्णी, लोणी, भगवाननगर, एकनाथ वाडी, उत्तमनगर, कासळवाडी, चुंभळी, ढोकवड, जांभळी आदी गावे या संस्थानला जोडलेली असून, ४३ वर्षांपासून सातत्याने ते आपले योगदान देत आहेत.

===Photopath===

120321\img20210312121823_14.jpg

Web Title: Mahaprasad of Mahashivaratra ceremony will reach home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.