स्वत: महाराजांनी लस घेत ग्रामस्थांची शंका दूर केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:06+5:302021-07-18T04:24:06+5:30

गेवराई : कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे ...

Maharaj himself took the vaccine to allay the suspicions of the villagers | स्वत: महाराजांनी लस घेत ग्रामस्थांची शंका दूर केली

स्वत: महाराजांनी लस घेत ग्रामस्थांची शंका दूर केली

googlenewsNext

गेवराई : कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगावचे दत्ता महाराज गिरी यांनी करीत स्वत: लस घेतली आणि त्यानंतर ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत गेला.

तालुक्यातील खळेगाव येथे गिरी महाराजांच्या उपस्थितीत कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ दत्ता महाराज गिरी यांनी स्वतः लस घेऊन केला. चकलांबा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. धनाजी बनसोडे यांनी आरोग्य विभागाची सर्व टीम खळेगावमध्ये लसीकरणासाठी पाठविली होती. खळेगाव उपकेंद्रात अँटिजन टेस्ट करून १८ वर्षांपासून पुढील १५६ महिला व पुरुषांनी लस घेतली. यावेळी सामुदाय आरोग्याधिकारी सय्यद, एन. बी. आरगडे, एस. जी. गिरी, एस. एन. शेळके, डी. बी. तरकसे, ए. एन. गाडे, आंधळे, वाय. पी. सानप, व्ही. बी. महानोर, पी. एन. साळवे, आश्विनी बावचकर, कॉ. अमोल औसरमल, सरपंच मच्छिंद्र पोपळघट, खळेगाव ग्राम सुरक्षा दलाचे मनोज शेंबडे, प्रसाद आहेर, बाळासाहेब आहेर आदी उपस्थित होते.

Web Title: Maharaj himself took the vaccine to allay the suspicions of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.