Maharashtra Bandh : बंदला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाधिकारी कचेरीसमोर जमाव जमल्याने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:15 PM2018-08-09T14:15:56+5:302018-08-09T14:18:11+5:30
मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
बीड : मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज बीड बसस्थानाकातून एकही बस बाहेर पडली नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष पथकांसह स्थानिक पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बीड शहर आणि जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमाव जमल्याने काही काळ वातावरणात तणाव.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे मराठा समाजातील बांधवांनी बैलगाडीसह रास्तारोको आंदोलन केले.
वडवणी शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यावर आंदोलकांचा ठिय्या.मुख्य बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट पहायला मिळत आहे. शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध व्यक्त केला.व शेकडो तरूणांनी मुंडन करून अर्धनग्न आंदोलन.
धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र -211वर बीड जिल्ह्यतील रौळसगाव येथे भजन कीर्तन आंदोलन सुरु !
माजलगाव कडकडीत बंद,परभणी चौफुलीवर आंदोलकांचा रास्ता रोको
गेवराईत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरासह तालुक्यातील चकलांबा, मादळमोही, उमापुर, धोडंराई, तलवाडा, सिरसदेवी, पाचेगावं, पाडळसिंगी, गढी, जातेगांव या सर्कलची सर्व गावे कडकडीत बंद.