Maharashtra Election 2019 : काश्मीरला विकास प्रवाहात आणले; अमित शहांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 06:06 AM2019-10-09T06:06:27+5:302019-10-09T06:07:32+5:30

पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते.

Maharashtra Election 2019: Kashmir brings development; Rendering of Amit Shah | Maharashtra Election 2019 : काश्मीरला विकास प्रवाहात आणले; अमित शहांचे प्रतिपादन

Maharashtra Election 2019 : काश्मीरला विकास प्रवाहात आणले; अमित शहांचे प्रतिपादन

googlenewsNext

बीड : देशातील जनतेने आमचे ३०२ खासदार निवडून दिले. आपल्या या शक्तीच्या जोरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम हटविले आणि काश्मीरला भारताच्या विकास प्रवाहात आणले; परंतु या ३७० कलम रद्द करण्याला काही मंडळी विरोध करीत आहेत. विरोध करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार का नाही, असा सवाल भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीरविषयक राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्याबद्दल अमित शहांना ३७० तोफांची सलामी देण्यात येणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी सभास्थळी ३७० जणांनी तिरंगा झेंडा फडकावून गृहमंत्री शहा यांचे स्वागत केले
अमित शहा म्हणाले, भगवानबाबांनी आयुष्यभर दीनदुबळे, वंचितांसाठी संघर्ष केला. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणानेच प्रगती होते, हे त्यांनी कृतीद्वारे दाखवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगार, मजूर यांच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला होता. तेच कार्य आज पंकजा मुंडे पुढे नेत आहेत. ७० वर्षांपासून ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी लढत होता.
पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र आयोग निर्माण करून त्यांच्यासाठी विकासाची दारे खुली केली. त्यांना संवैधानिक दर्जा प्राप्त करून दिला. वंचित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत.

‘पंकजा मुंडे सीएम...’
सभेच्या एका कोपºयातून ‘सीएम, सीएम... पंकजा मुंडे सीएम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. अमित शहा यांचे भाषण संपेपर्यंत ही घोषणाबाजी सुरू होती. घोषणा देणाऱ्यांच्या बाजूने काही सुरक्षारक्षक जात असताना अमित शहा यांनी त्यांना रोखले.

Web Title: Maharashtra Election 2019: Kashmir brings development; Rendering of Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.