Maharashtra Election 2019 : माजलगाव मतदारसंघ : छाननीत वंचितच्या जीवन राठोड यांच्यासह १४ उमेदवारी अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:07 PM2019-10-05T18:07:33+5:302019-10-05T18:10:27+5:30
छाननीमध्ये ८ उमेदवारांचे १४ अर्ज बाद झाले.
माजलगाव : विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी छाननीमध्ये ६४ दाखल अर्जांपैकी ८ उमेदवारांचे १४ अर्ज बाद झाले. यामध्ये वंचित आघाडीचे जीवन राठोड यांच्या अर्जाची समावेश आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात ६४ जणांनी आपले ९१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे रमेश आडसकर, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे प्रकाश सोळंके, वंचित बहुजन आघाडीचे जीवन राठोड, धम्मानंद साळवे या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश होता. शनिवारी तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर ,सहायक अधिकारी प्रतिभा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जीवन राठोड यांचा अर्ज मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा असल्यावरून बाद करण्यात आला. तर मोहन बाजीराव जगताप,जयसिंह सोळंके, ऋषिकेश देशमुख, किरण चव्हाण, शेषराव मुंडे( बहुजन समाज पार्टी), सईद गफ्फार स.अख्तर, इनामदार शफीयोद्दीन अशा आठ उमेदवारांचे १४ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत.