Maharashtra Election 2019 : ईव्हिएम हॅकिंगची भीती; स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवण्याची धनंजय मुंडेंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 05:12 PM2019-10-18T17:12:02+5:302019-10-18T17:46:07+5:30
Maharashtra Election 2019 : मागील काही निवडणूकांपासून देशात ईव्हिएम मशिन हॅकींगची जोरदार चर्चा होत आहे
परळी : विधानसभा निवडणूकीच्या ईव्हिएम मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँंगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मागील काही निवडणूकांपासून देशात ईव्हिएम मशिन हॅकींगची जोरदार चर्चा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून, निवडणूक प्रक्रीयेतून निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
I have requested #EC to install jammer over the strong room and vote counting booths to avoid #EVM hacking. People are suspicious about the authenticity of EVM machine and its result. Therefore we want jammer to be installed for the fair and transparent electoral process. pic.twitter.com/nAbVfjlNm2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 18, 2019
सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत, तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा दि.21 ऑक्टोबर, 2019 ते दि.24 ऑक्टोबर, 2019 पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.