Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे आज असते तर राजकारणातील सौहार्द टिकून राहिलं असतं : धनंजय मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:41 PM2022-06-03T13:41:46+5:302022-06-03T13:51:40+5:30

पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीला मला त्यांनीच उभे केले अन.., धनंजय मुंडेंनी दिला आठवणींना उजाळा.

maharashtra minister gopinath munde remembers gopinath munde given him first chance | Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे आज असते तर राजकारणातील सौहार्द टिकून राहिलं असतं : धनंजय मुंडे 

Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे आज असते तर राजकारणातील सौहार्द टिकून राहिलं असतं : धनंजय मुंडे 

googlenewsNext

परळी : “गोपीनाथ मुंडे हे आज हयात असते तर मागच्या ५-६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडले आहेत, ते कदाचित घडले नसते. राजकारणातील सौहार्द कायम टिकून राहिले असते,” असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष सावलीसारखा सोबत राहिलो, त्यांच्या संघर्षाच्या काळात देखील मी क्षणोक्षणी सोबत होतो,” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  

आज गोपीनाथगड (पांगरी) ता. परळी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगडावरील स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे हे सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते, ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला, त्यांचा बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाची प्रगती, ऊस तोड कामगारांचे कल्याण हे स्वप्न उराशी बाळगूनच मी काम करतो आहे. ऊसतोड कामगार महामंडळाची अधिकृत स्थापना देखील झाली असून, आता कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीचे स्वप्न देखील पूर्ण करणार असल्याचा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

“गोपीनाथ मुंडे यांनी माझे वडील, पंडित अण्णा मुंडे यांच्याशी माझ्या जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी साठी अक्षरशः वाद घातला, पण ते स्वतः १९७८ साली लढले. त्याच पट्टीवडगाव गटातून मला उमेदवारी दिली, मी विजयी झालो आणि माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,” अशी आठवण सांगताना धनंजय मुंडे भावुक झाले होते. 

आजही त्यांचा आवाज माझ्या कानात घुमतो...
धनंजय मुंडे यांनी सकाळी 'अप्पा आजही तुमचा आवाज माझ्या कानात घुमतो' अशा आशयाचे ट्वीट करून गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण केली होती, याबद्दल माध्यमांनी विचारले असता, धनंजय मुंडे म्हणाले, 'होय, सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांची उकल करून त्यांना न्याय देणारा मुंडे यांचा आवाज होता, आम्हाला त्यांनी तीच शिकवण दिली व तीच शिकवण आम्ही अंगीकृत केली, आजही सर्व सामान्य माणसाच्या न्यायासाठीचा त्यांचा तो आवाज माझ्या कानात घुमतो...'

Web Title: maharashtra minister gopinath munde remembers gopinath munde given him first chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.