राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:07+5:302021-03-31T04:34:07+5:30

माजलगाव (जि. बीड) : केरळ राज्यातील कासारगोड, उदमा येथे २८ व २९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ...

Maharashtra team first in national tennis volleyball tournament | राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ देशात प्रथम

राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ देशात प्रथम

माजलगाव (जि. बीड) : केरळ राज्यातील कासारगोड, उदमा येथे २८ व २९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील आनंदगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. येथील विद्यार्थिनी निकिता शिवाजी थावरे कर्णधार असलेला यूथ गट मुलीचा संघ देशात प्रथम आला.

या संघाने पहिला सामना आंध्र प्रदेश सोबत २-० ने, दुसरा सामना कर्नाटक सोबत २- ० ने, तिसरा सामना तमिळनाडू सोबत २-० ने, चौथा सामना छत्तीसगढ सोबत २-१ ने जिंकला आहे, तर अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्रच्या प्रणिता थावरेने उत्कृष्ट खेळ सादर करीत महाराष्ट्राकडे विजय खेचून आणला. याशिवाय मिनी गट (मुलांचा) हा संघ देशात द्वितीय आलेला असून, या संघाचे नेतृत्व हर्षवर्धन हनुमान थावरे याने केले. कर्णधार रूपाली नामदेव साखरे हिच्या नेतृत्वाखाली मिनी गट मुलींच्या संघाने देशात तृतीय क्रमांक पटकावला, तर रूपाली नामदेव साखरे व कार्तिक केशव साखरे यांनी मिनी गट मिश्र दुहेरीत देशात द्वितीय क्रमांक पटकावला. कर्णधार प्रमोद कोरडे यांच्या नेतृत्वाखाली युथ गट मुले देशात द्वितीय आलेला आहे. ही सर्व मुले माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या आनंदगाव जिल्हा परिषद शाळेतील असून, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून राज सोनपसारे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नांच्या रंगाची उधळण करून खऱ्या अर्थाने धूलिवंदन घडवून आणणाऱ्या आदर्श गुरूंचे व यशस्वी खेळाडूंचे स्वागत होत आहेत. या सर्व खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, केंद्रप्रमुख बलशेटवार, केंद्रीय मुख्याध्यापक अशफाख, मुख्याध्यापक एस. एस. राठोड, गंगाधर वानोळे, भालचंद्र खुर्पे, जिजाराम खुडे, बी. डी. राठोड, नंदलाल भंडारी, नायबळ, धपाटे, श्रीमती पाचनकर, श्रीमती साळुंखे, आदी शिक्षकांनी केले.

===Photopath===

300321\30bed_9_30032021_14.jpg

===Caption===

राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्यांमध्ये माजलगाव तालुक्यातील  आनंदगाव येथील खेळाडुंचा सहभाग होता.

Web Title: Maharashtra team first in national tennis volleyball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.