बीडमध्ये बिंदुसरा नदीपात्रात महास्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:14 AM2018-06-01T01:14:40+5:302018-06-01T01:14:40+5:30
बीड शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता अभियानास उतरले.
बीड : शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता अभियानास उतरले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. बिंदुसरा नदीचे आठ टप्पे तयार करण्यात आले. यासाठी कार्यकर्त्यांच्या १० टीम तयार करण्यात आल्या. प्रत्येक टीमला प्रमुख नेमून त्यांना पोकलँड, जेसीबी, टिप्पर, ट्रॅक्टर, कुºहाड, कोयता हे साहित्य देण्यात आले.
प्रत्येक टीमला एक स्वतंत्र टप्पा स्वच्छ करण्यासाठी देण्यात आला होता. २ टीम राखीव ठेवत त्यांवर महास्वच्छता अभियानात श्रमदान करणाºया कार्यकर्त्यांना चहा, नाश्ता व पाणी पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. योग्य नियोजनामुळे सोमेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील भागापासून ते कृष्ण मंदिरापर्यंत बिंदुसरा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. मोहीम सुरू झाल्यानंतर प्रत्येक टप्प्याची पाहणी आ. विनायक मेटे यांनी केली व योग्य त्या सूचना दिल्या.
स्वच्छता अभियान सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहून अभियानास सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, विजयराज बंब, कल्याणराव आखाडे, अशोक हिंगे यांची भाषणे झाली.
डॉ. सुभाष जोशी, डॉ. पी.के. कुलकर्णी, वसंत मुंडे, वैभव स्वामी, रोटरी क्लबचे विजय दुरूंदे, उमेश पवळ, संध्या मिश्रा, नामदेवराव दुधाळ, मंगेश लोळगे, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे, सुहास पाटील, अनिल घुमरे, अॅड. राहुल मस्के, ज्ञानेश्वर कोकाटे, बबन माने, बबन जगताप, दिनेश पवार, सोमनाथ माने, गोपीनाथ घुमरे, अंगद आबूज, दशरथ मोरे, ज्ञानेश्वर पानसंबळ, गणेश मोरे, माऊली शिंदे, योगेश शेळके आदीसह शिवसंग्राम पदधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
जूनअखेर बार्शी नाका पूल वाहतुकीस खुला
बिंदुसरा नदीवरील बार्शी नाका येथील पूलाचे काम 15 ते 20 जूनपर्यंत पूर्ण होईल.आणि जून अखेर पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु या पुलाच्या उदघाटनाची तारीख केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून ठरवली जाईल.त्याच बरोबर नदीवरील बंधाºयाचे काम नगर पालिकेच्या पाईप लाईन शिपटींगमुळे थांबवले आहे.पाईपलाईन शिपटींग झाली की ते कामही लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे आ.विनायक मेटे यांनी सांगितले.