घोटाळेबाज महेश मोतेवारला सात दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 08:08 AM2021-11-20T08:08:45+5:302021-11-20T08:09:02+5:30

मुदत उलटूनही ठेवी परत न केल्याने बीड शहर ठाण्यात सय्यद रहेमा सय्यद नियामत (रा. इस्लामपुरा, बीड) यांच्या तक्रारीवरून महेश मोतेवार, शशिकांत काळकर व सुनीता थोरात यांच्यावर ३० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा नोंद झाला होता.

Mahesh Motewar remanded in police custody for seven days | घोटाळेबाज महेश मोतेवारला सात दिवसांची पोलीस कोठडी

घोटाळेबाज महेश मोतेवारला सात दिवसांची पोलीस कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत २२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. बीडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क       
बीड : समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून अंदाजे साडेचार हजार कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या घोटाळेबाज महेश किसन मोतेवार याला येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.          

मुदत उलटूनही ठेवी परत न केल्याने बीड शहर ठाण्यात सय्यद रहेमा सय्यद नियामत (रा. इस्लामपुरा, बीड) यांच्या तक्रारीवरून महेश मोतेवार, शशिकांत काळकर व सुनीता थोरात यांच्यावर ३० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा नोंद झाला होता. आतापर्यंत २२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. बीडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे.  

Web Title: Mahesh Motewar remanded in police custody for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.