मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:41 PM2021-12-09T13:41:55+5:302021-12-09T13:42:46+5:30

२४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

The main door is one but three to escape! Ruling party official's gambling set up at farm demolished by police | मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त

मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त

Next

बीड: राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका राजकीय पदाधिकाऱ्रूच्या जुगारअड्ड्यावर छापा टाकून सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई बेलगाव (ता.गेवराई) येथे करण्यात आली. दरम्यान,छाप्यानंतर शेडच्या तीन दरवाजांतून जुगाऱ्रूांनी ऊसाच्या शेतात धूम ठोकली. त्यामुळे एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

बेलगाव (ता.गेवराई) येथे रवी पवार याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये राजरोस जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना मिळाली होती. रवी पवारच्या शेताील हा जुगारअड्डा एका राजकीय पदाधिकाऱ्रूाच्या इशाऱ्यावर सुरु होता, अशी माहिती आहे.

अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सहायक निरीक्षक शामकुमार डोंगरे, हवालदार गजानन ठेंगळ, पो.ना.पांडुरंग काचगुंडे, सूरज काकडे, अलताफ शेख व राखीव दलाच्या जवानांना सोबत घेऊन ८ रोजी रात्री साडेदहा वाजता छापा टाकला. याप्रकरणी हवालदार गजानन ठेंगळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात १५ जणांवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळी गाद्या. सतरंज्या. काही मोबाइल, एक जीप, तीन कार, १० दुचाकी, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

शेडला चार दरवाजे, पलायनासाठी सोय
पत्र्याच्या शेडला चोहोबाजूने दरवाजे आहेत. मुख्य दरवाजातून पोलीस कारवाईसाठी आत शिरले तरी तातडीने पळून जाता यावे, यासाठी शेडला चोहोबाजूने दरवाजांची सोय केलेली आहे. पोलीस शेडमध्ये शिरताच तीन दरवाजांतून जुगाऱ्रूांनीबाहेर पडून अंधाराचा फायदा घेत ऊसाच्या शेतात पोबारा केला.

Web Title: The main door is one but three to escape! Ruling party official's gambling set up at farm demolished by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.