बीड जिल्ह्यात मतदानावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:39 PM2019-10-20T23:39:34+5:302019-10-20T23:40:35+5:30

आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

To maintain law and order during voting in Beed district, Kadakot arrangements are in place | बीड जिल्ह्यात मतदानावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

बीड जिल्ह्यात मतदानावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक : कायदा हातात घेणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

बीड : आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, जिल्ह्यातील सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याची तयारी मागील काही दिवसांपूसन सुरु आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये कलम १०७ अन्वे १५३९, कलम १०९ नुसार १३, कलम १०१ नुसार ५६, कलम १४४ नुसार ३०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दोन टप्प्यात करण्यात आली. ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात व दुसºया टप्प्यात इतरांवर कारवाई करण्यात आली. ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेने पार पडली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून, सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. ३४ ठिकाणे ही संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पोद्दार म्हणाले.
संवेदनशील केंद्रांवर जास्तीचा बंदोबस्त
जिल्ह्यात ३४ मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आले असून त्याठिकाणी जास्तीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षी ६ सीआरपीएम तुकड्या त्यामध्ये प्रत्येकी ९० ते १०० जण असणार आहेत. पोलीस कर्मचारी १९१०, पोलीस उपअधीक्षक १०, पोनि २९, पोउपनि १५९, होमगार्ड २२०५ सुरक्षेसाठी असणार आहेत. दरम्यान काही ठिकाणी फिरते पथक व तपासणी पथक देखील कर्तव्य बजावणार आहे.
सोशल मीडियावर करडी नजर
सोशल मीडियावर प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यासाठी एक विशेष सेलची निर्मिती करण्यात आली असून, आक्षेपार्ह पोस्ट किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारी तसेच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे संदेश पाठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
विविध कारवाया
आचारसंहिता घोषित झाल्यापासून ७ लाख ८३५ रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे. तसेच ५ ठिकाणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अवैध शस्त्र बाळगणाºया ४ जणांवर कारवाई केली आहे. तसेच ३५० जणांवर अवैध दारू विक्री केल्याप्रकणी गुन्हा दाखल करुन ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१३ लाख १८ हजार रुपयांचा गुटखा, ५ लाख ६० हजार रुपयांचा गांजा, १ लाखाचे रॉकेल पकडले आहे.

Web Title: To maintain law and order during voting in Beed district, Kadakot arrangements are in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.