मुख्याधिकाऱ्यांनी मार्केट बंदचे आदेश काढले व्हाट्सएप अॅप स्टेटसवर; व्यापाऱ्यांची उडाली धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:39 PM2021-04-24T13:39:29+5:302021-04-24T13:47:16+5:30

शासनाचे नवीन नियम निघाल्याने विकेंड लाँकडाऊन अंतर्गत 17 व 18 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनीही बंद केले नाही व प्रशासनाने देखील त्यांना नवे आदेश दिले नव्हते

Majalgaon CEO orders market shutdown on WhatsApp app status; The rush of merchants | मुख्याधिकाऱ्यांनी मार्केट बंदचे आदेश काढले व्हाट्सएप अॅप स्टेटसवर; व्यापाऱ्यांची उडाली धांदल

मुख्याधिकाऱ्यांनी मार्केट बंदचे आदेश काढले व्हाट्सएप अॅप स्टेटसवर; व्यापाऱ्यांची उडाली धांदल

Next
ठळक मुद्देनगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी आपल्या स्टेटसवर विकेंड लॉकडाउनचे आदेश दिलेमुख्याधिकारी यांनी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश काढल्याने यामुळे व्यापारात संभ्रम निर्माण झाला.

माजलगाव : शहरातील मेडिकल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी विकेंड लाँकडाऊनचा जिल्हा प्रशासनाकडुन काहीच आदेश नसतांना येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी व्हाट्सएप अॅप स्टेटसवरुन असे आदेश काढल्याने शनिवारी सकाळी एकच गोंधळ उडाला. लेखी आदेश काढण्याऐवजी व्हाट्सएप अॅप स्टेटसवरुन आदेश आल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यात काही व्यापाऱ्यांनी लेखी आदेश दाखवल्याशिवाय बंद करण्यास विरोध दर्शविला.

महाराष्ट्र शासनाने 15 दिवसापूर्वी विकेंड लाँकडाऊनच्या अंतर्गत शनिवार व रविवार रोजी मेडीकल वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माजलगाव शहरासह संपूर्ण जिल्हा 10 व 11 एप्रिलला बंद होता.त्यानंतर शासनाचे नवीन नियम निघाल्याने विकेंड लाँकडाऊन अंतर्गत 17 व 18 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनीही बंद केले नाही व प्रशासनाने देखील त्यांना नवे आदेश दिले नव्हते . परंतु, येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी आपल्या स्टेटसवर विकेंड लॉकडाउनच्या अंतर्गत मेडिकल वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. यात आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हा नोंदवून दुकान सिल करून लायसन रद्द करण्यात येतील असेही या स्टेटसमध्ये नमुद केले आहे. मुख्याधिकारी यांनी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश काढल्याने यामुळे व्यापारात संभ्रम निर्माण झाला. यात सकाळपासूनच पोलीस दुकान बंद करण्यास सांगत होते. या बंदला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत  आम्हाला शासनाचे किंवा जिल्हा प्रशासनाचे लेखी आदेश दाखवा म्हणताच पोलीस देखील निरुत्तर झाले.

तालुका प्रशासनाने बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मुख्याधिकारी यांनी लेखी आदेश काढण्याऐवजी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश दिल्याने संभ्रम निर्माण झाला. पोलीसांनी अनेकांना जबरदस्तीनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. आम्ही नेहमी प्रशासनास मदत करण्यास तत्पर आहोत, मात्र अशा पद्धतीने व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश देऊन बंद पाळण्यास आमचा  विरोध आहे.
- संजय सोळंके, अध्यक्ष, किराणा असोसिएशन, माजलगाव

बंदचे आवाहन केले होते
व्यापाऱ्यांनी बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आम्ही सांगितले होते. आम्ही बंदचे आदेश लेखी स्वरूपात दिले नव्हते फक्त आवाहन केले होते. मुख्याधिकारी यांनी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश काढले असतील तर ते चुकीचे आहे.
- वैशाली पाटील , तहसीलदार, माजलगाव
 

Web Title: Majalgaon CEO orders market shutdown on WhatsApp app status; The rush of merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.