माजलगाव दणाणले ; शेतक-यांच्या प्रश्नासाठी सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:46 AM2017-12-21T00:46:24+5:302017-12-21T00:47:38+5:30
माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला.
माजलगाव : माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला. माजलगावात काढलेल्या बैलगाडी मोर्चात ते बोलत होते.
माजलगाव शिवसेनेच्या वतीने शेतक-यांना बोंडअळीमुळे नुकसान भरपाई द्यावी, विज बील माफ करून २४ तास वीज पुरवठा करावा, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी, उसाला तीन हजार रूपये भाव द्यावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया रद्द करावी, यासारख्या विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयावर जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढला.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, आप्पासाहेब जाधव, शहर प्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुका अधिकारी अॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके यांची ही भाषणे झाली.
यावेळी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने बैलगाड्यांसह मोर्चात सहभागी झाले होते. घोषणांनी माजलगाव शहर दणाणून गेले
होते.
पहिल्यांदाच ऐतिहासिक बैलगाडी मोर्चा
माजलगाव तालुक्यात शेतक-यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये जवळपास २०० बैलगाडी सहभागी होत्या. त्यांची रांग ही दोन कि.मी. पर्यंत होती. परंतु शिस्त असल्यामुळे हा मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता.
शेतकरी, व्यापाºयांसाठी हेल्पलाईन - जाधव
तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, महिला-मुली यांच्यावर कुणी अन्याय करत असेल तर मदतीचा हात म्हणून शिवसेनेकडून हेल्पलाईन (मो.९३९३१८९५९५) सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी पाच मिनीटात शिवसैनिक किंवा मी स्वत: धावून येईल, असे आप्पासाहेब जाधव यांनी सांगीतले.
पालकमंत्री आमदारांना देणे-घेणे नाही
सचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतक-यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतक-यांच्या प्रश्नांशी देणे-घेणे राहिलेले नाही. विधानभवनात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शब्दही उच्चारला नाही, असे सांगितले. त्यातच तालुक्यातील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहेत. मागील तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत जोपासलेल्या ऊसाला कारखानदारांकडून कवडीमोल भाव देण्यात येत असून त्यात शेतक-यांच्या हिताची असलेल्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद न घेण्याचे धोरण स्विकारले आहे. परंतु आपण हे धोरण कदापी सहन करणार नसून कारखान्यांनी नोंद न घेतल्यास तीनही कारखान्यांचे धुरांडे बंद पाडल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नसल्याचा इशारा मुळूक यांनी दिला.