माजलगाव धरण १०० टक्के भरले; ११ दरवाजे उघडून ६२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 08:07 AM2021-09-06T08:07:06+5:302021-09-06T08:12:16+5:30
Rain In Beed : पहाटे सहा वाजता 11 दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील माजलगाव धरण ( Majalgaon Dam ) क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस ( Rain In Beed ) पडत असल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सोमवारी पहाटे सहा वाजता 11 दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून सिंदफना पात्रात 62 हजार क्युसेक ऐवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ( Majalgaon dam 100 percent full; Discharge of 62,000 cusecs of water by opening 11 doors)
माजलगाव धरणाची यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील 2 दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. हे धरण सोमवारी पहाटे पुर्ण क्षमतेने भरले. यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय पहाटे घेतला. धरणाची पाणी पातळी 431.80 मीटर ऐवढी आहे .शनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण 100 टक्के भरले. यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. धरणात सध्या 62 हजार 517 क्युसेक पाण्याची आवक आहे. तेवढ्याच क्षमतेने पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर. शेख यांनी दिली.
दरम्यान, माजलगांव धरण शंभर टक्के भरल्याने सिंधफना नदीत मोठ्याप्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे सांडस चिंचोली या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला.
Majalgaon Dam :
Date:-6/9/ 2021 Time: - 7:00
1) Water level:- 431.80
2) Gross storage=454.00/454.00 Mm3.
3) Live storage: - 312.00/312.00 Mm3
4) Percentage. 100%
5) inflow :- 62517 cusecs
6)No of spillway gate 0pened = 11 gate (1.50 m)
7) Discharge Through gate = 1770.263/ 62517cuse