माजलगाव धरण @ ५० टक्के; पाणी पातळीत रात्रीतून १५ टक्यांने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 06:22 PM2021-08-31T18:22:43+5:302021-08-31T18:25:28+5:30
गेल्यावर्षी माजलगाव धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले होते.
माजलगाव : माजलगाव धरण परिसरात मागील २४ तासात ५० मी.मी.पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे धरणात चांगल्याच पाण्याची वाढ झाली. चोवीस तासापूर्वी धरणात ३५ टक्के पाणीसाठा होता. तो मंगळवारी दुपारी ५० टक्के झाला होता. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्यावर्षी माजलगाव धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे अनेक दिवस धरणातून सिंदफना पात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे कालवा व नदी द्वारे अनेक वेळा शेतीला व पिण्यासाठी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 204.50 दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर 62.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व 19.87 टक्के पाणी होते.बेमोसमी पावसानेच दोन टक्के पाणी पातळीत वाढ झाली होती.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर
सोमवारी सकाळी धरणात 428.74 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 254 दलघमी एवढा एकूण पाणीसाठा होता. तर 112 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता तर 35.90 टक्के पाणी साठा होता. धरण क्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन मंगळवारी दुपारी 12 वाजता धरणाची पाणी पातळी 429.48 मिटर झाली. उपयुक्त साठा 153 दलघमी तर एकुन पाणी साठा 295 दलघमी झाला होता.यामुळे धरणाची टक्केवारी 50 टक्के झाली होती. धरणा 47 हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरू होती. माजलगाव तालुक्यात 50 मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.
Video : नामी शक्कल ! पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार