माजलगाव धरण @ ९५ टक्के; धरणातून केव्हाही व्होऊ शकतो पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:41 AM2020-09-16T07:41:24+5:302020-09-16T07:41:56+5:30
माजलगाव धरणातून पाणी केव्हाही सुटु शकते
माजलगाव : मागील चार दिवसापासून माजलगाव धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे या धरणाच्यापाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी 6 वाजता धरण 95 टक्के भरले होते. यामुळे आता या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येऊ शकते यामुळे धरणाखालील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माजलगाव धरण यावर्षी सुरुवातीपासूनच पाणी पातळी वाढत होती ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती मागील चार दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता धरणाच्या पाण्याची पातळी 95 टक्के एवढी झाली होती . धरणात बुधवारी सकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी 431.61 मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा 438.80 दलघमी एवढा असल्याची माहिती धरणाचे अभियंताबी.आर. शेख यांनी दिली.
मंगळवारी रात्री धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने हे धरण बुधवारी रात्रीपर्यंत भरू शकते यामुळे धरणाचे दरवाजे केव्हाही उघडू शकतात. धरणातुन पाणी सोडण्यात येऊ शकते यामुळे धरणा खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी दिली.