माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:39 PM2019-10-06T23:39:20+5:302019-10-06T23:39:56+5:30

मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे.

Majalgaon Dam dead outside the grave | माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर

माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर

Next
ठळक मुद्दे१.७३ मीटरने पाणीपातळी वाढली : आणखी साडेपाच मीटरची गरज

माजलगाव : मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे.
परतीचा पाऊस सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना येथील माजलगाव धरणाचीपाणी पातळी जिवंत साठयात येण्यासाठी दोन मिटर पातळीची आवश्यकता होती. अनेक वेळा हे धरण परतीच्या पावसाने भरले होते तर २०१६ मध्ये २२ सप्टेंबर रोजी भरले होते. त्यामुळे यंदाही हे धरण परतीच्या पावसावर भरेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.
यावर्षी उन्हाळ्यात तीव्र दुष्काळामुळे धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढे पाणी लागते. ३० जून रोजी या धरणाची पाणी पातळी ४२३ मीटर इतकी झाली होती. यावेळी धरणात ६६ दलघमी एवढाच पाणी साठा शिल्लक होता. या धरणात ४५४ दलघमी ऐवढा पाणी साठा आवश्यक असतो. धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस झाल्याने तसेच पैठण येथील जायकवाडी धरणातून १३ आॅगस्टपासून सोडण्यात आल्याने ९४.४० दलघमी पाणी साठा झाला होता. तर ४२४.२८ मीटर एवढी पाणी पातळी धरणात झाली होती. हे धरण टक्केवारीत येण्यासाठी ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा आवश्यक आहे.
मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला व रविवारी सायंकाळी एक तास जोरदार पाऊस झाल्याने पाणी पातळी १.७३ मीटरने वाढून धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. आता धरण भरण्यासाठी साडेपाच मीटर पाणीपातळीची गरज आहे. येत्या काही दिवसात धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास समाधान मिळणार आहे.

Web Title: Majalgaon Dam dead outside the grave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.