माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:11 PM2019-09-20T18:11:36+5:302019-09-20T18:14:46+5:30

जिवंत साठ्यात येण्यासाठी २ मिटर पाण्याची आवश्यकता

Majalgaon Dam still in dead storage; Only water level increased by one and a half meters | माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी

माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक वेळा परतीच्या पावसावर भरले होते धरणअडीच महिन्यात केवळ दिड मिटरच वाढली पाणी पातळी

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव :परतीचा पाऊस सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना येथील माजलगाव धरणाची पाणी पातळी जिवंत साठयात येण्यासाठी दोन मिटर पाणी पातळीची आवश्यकता असुन अनेक वेळा हे धरण परतीच्या पावसाने भरले होते त्यामुळे हे धरण परतीच्या पावसावर भरेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.

गेल्यावर्षी माजलगाव धरण परिसरात अत्यल्प पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढे पाणी लागते.३० जुन रोजी या धरणाची पाणी पातळी ४२३.०० मीटर ऐवढी झाली होती. यावेळी धरणात ६६ दलघमी ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता.या धरणात ४५४ दलघमी ऐवढा पाणी साठा आवश्यक असतो.मागील आठ दिवसात धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस झाल्याने व पैठण येथील जायकवाडी धरणातुन १३ ऑगस्टपासुन सोडण्यात आल्याने ९४.४० दलघमी ऐवढा पाणी साठा शुक्रवारी सकाळी झाला होता.तर ४२४.३८  मीटर ऐवढी पाणी पातळी धरणात झाली होती.

हे धरण टक्केवारी येण्यासाठी ४२६.११ मीटर ऐवढा पाणी साठा आवश्यक असल्याने अद्याप हे धरण टक्केवारीत येण्यासाठी १.७३ मीटर पाणी आवश्यक आहे. धरणाची पाणी पातळी अद्याप १५.२६ टक्यांनी खालावलेलीच आहे. तर हे धरण भरण्यासाठी अद्याप ७.४२  मीटर पाण्याची आवश्यकता आहे.धरणात शुक्रवारी ७०० क्युसेक ऐवढी आवक होती.तर ३७ दलघमी ऐवढे पाणी आजपर्यंत धरणात आले आहे त्यात २२ दलघमी पाणी हे पैठण येथील जायकवाडी धरणातुन आले आहे तर १५ दलघमी पाणी केवळ पावसाचे असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.

परतीच्या पावसाची आशा
मागील दहा वर्षात अनेक वेळा माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. मात्र , अनेक वेळा परतीच्या दोन-तीन पावसातच हे धरण भरले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी हे धरण परतीच्या पावसावर भरेल अशी आशा शेतकरी वर्गातून होत आहे. हवामान खात्याने या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल अशी आशा व्यक्त केल्याने हे धरण नक्कीच भरेल अशी आस सर्वांना लागली आहे.

Web Title: Majalgaon Dam still in dead storage; Only water level increased by one and a half meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.