माजलगावात विनामास्क फिरणाऱ्यांना दणका, दोन दिवसात ३० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:05+5:302021-02-27T04:45:05+5:30
: शहरात मागील तीन दिवसांपासून नगरपालिका व शहर पोलीस यांच्याकडून शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाया करणे सुरू आहे. नगरपालिकेने ...
: शहरात मागील तीन दिवसांपासून नगरपालिका व शहर पोलीस यांच्याकडून शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाया करणे सुरू आहे. नगरपालिकेने दोन दिवसांत ३० हजार रुपये नगरपालिकेने दंड वसूल केला आहे.
मागील आठ दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर माजलगाव नगरपालिका व शहर पोलिसांनी मिळून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या. मागील दोन दिवसात नगरपालिकेने ३० हजार रुपये दंड वसूल केला.
माजलगाव शहरातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आणखी दोन दिवस मास्क वापरण्यासाठी वेळ देण्यात येणार असून, त्यांच्याकडून केवळ २०० रुपयेच दंड वसूल केला जात आहे. दोन दिवसांनंतर विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये आकारण्यात येणार असल्याचे कोविड प्रमुख शिवहर शेटे यांनी सांगितले.
कारवाई करणाऱ्या पथकात प्रमुख शिवहर शेटे, गणेश डोंगरे, फुलचंद कटारे, भुजंग गायकवाड, सुधाकर उजगरे, नीलेश कांबळे, संकेत साळवे, सागर उजगरे, पांडुरंग कुलकर्णी, संतोष घाडगे आदींचा समावेश आहे.
माजलगावात हे पथक केवळ शहर पोलीससमोर, संभाजी चौक व शिवाजी चौक या ठिकाणीच कारवाया करताना दिसत आहेत; परंतु शहरातील विविध चौकाचौकात थांबुन दंड आकारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केवळ शहर पोलीसच दिसत असून, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कारवाया केलेल्या दिसत नसून त्यांनीदेखील कारवाया कराव्यात, अशी मागणी होत आहे.
माजलगावात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत दोन दिवसात ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
===Photopath===
260221\26bed_12_26022021_14.jpg