माजलगाव जलविद्युत केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:19 AM2018-07-12T00:19:15+5:302018-07-12T00:19:28+5:30

माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली.

Majalgaon hydro power center | माजलगाव जलविद्युत केंद्राला घरघर

माजलगाव जलविद्युत केंद्राला घरघर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु पुढील दोन-तीन वर्ष कार्यान्वित राहिल्यानंतर मागील सात ते आठ वर्षांपासून हा जलविद्युत केंद्र केवळ यंत्र समुग्रीची योग्य देखभाल न केल्यामुळे बंद आहे.
धरणातून उजव्या कालव्याद्वारे किमान ५ ते ६ पाणीपाळ्या शेतकºयांना सिंचनासाठी दरवर्षी दिल्या जातात. तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला देखील आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. वाहून जाणाºया या पाण्याचा वापर व्हावा,या हेतूने येथे जलविद्युत केंद्राची उभारणी झाली. या ठिकाणी ७५० के.व्ही. क्षमतेचे तीन संच आहेत. पैकी संच क्र. १ हा पहिल्याच वर्षी निकामी झाला तर संच क्र.२ चे द्रवचलित उच्चलक हे निकामी झाले. त्यामुळे संच ३ मध्ये बिघाड झाल्यानंतर त्याचे साहित्य वापरल्यामुळे संच २ देखील बंद पडला. २०११ मध्ये येथील चालू असलेल्या एकमेव संचावरच वीज निर्मिती केवळ नावापुरतीच झाली. त्या नंतर मात्र २०११ पासून संपूर्ण जलविद्युत केंद्रच बंद पडलेले आहे.
येथील यंत्र सामुग्रीची अवस्था भंगारात घालण्याजोगी झाली असून, आता कितीही खर्च केला तरी जलविद्युत केंद्र कार्यान्वित होईल अथवा नाही या बाबत शंकाच आहे.
येथील सुरक्षा वाºयावर असून, रात्री तर सोडाच; दिवसादेखील या ठिकाणी वॉचमन अथवा कर्मचारी नसतो तरीही येथील सुरक्षेच्या नावावर खर्च केला जात असल्याची माहिती समोर आहे. अधिकाºयांनी भ्रष्टाचार चालविल्याच्या तक्रारी आहेत.
तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटावा म्हणून जलसंपदा खात्याने २५ वर्षापूर्वी या वीजनिर्मिती प्रकल्पावर करोडो खर्च करत धरणावर प्रकल्प उभा केला. तेवढा खर्च देखील निघाला नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे ७-८ वर्षात एक युनिटही वीज तयार झाली नाही.
गोदावरी जलविद्युत, उपसा सिंचन विभागाचे येथील शाखा अभियंता नितीन जोगळेकर यांच्याशी संपर्क केला असता, ‘मला काहीही माहिती सांगता येणार नाही, तुम्ही औरंगाबादला या’ म्हणत टाळाटाळ केली. तर कार्यकारी अभियंता डी.एस. तडवी यांनी देखील असेच उत्तर देऊन येथे चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत कानावर हात ठेवला.

Web Title: Majalgaon hydro power center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.