माजलगावात ‘माकप’ने पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:18+5:302021-05-28T04:25:18+5:30

कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून देशातील शेतकरी मागील सहा महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने दखल घेतलेली ...

In Majalgaon, MACP observed a black day | माजलगावात ‘माकप’ने पाळला काळा दिवस

माजलगावात ‘माकप’ने पाळला काळा दिवस

Next

कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून देशातील शेतकरी मागील सहा महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने दखल घेतलेली नाही. तीन कृषी कायदे, चार श्रमसंहिता व वीज विधेयकांच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, संघटित आणि असंघटित कामगारांच्या जीवनाचा कणाच मोडायचा डाव टाकला जात आहे. रोज पेट्रोल, तेल आणि गॅस दरवाढीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. देशाला ग्रासलेल्या कोरोनाच्या महामारीचा गैरफायदा घेत मोदी सरकार हे धोरण रेटत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मोदी सरकारची कामगिरी नुसतीच भोंगळ नव्हती तर भारतीयांचे जीव वाचवण्याच्या कामाकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केले. घराघरांतील आपला माणूस गमावत असल्याचे जनतेला निमूटपणे पाहत हताशपणे बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे माजलगाव तालुका माकपच्या वतीने निषेध दिवस पाळण्यात आला.

यावेळी काळा झेंडा फडकावून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. मुसद्दीक बाबा, कॉ. सय्यद याकूब, कॉ. सादेक पठाण, कॉ. विठ्ठल सक्राते, कॉ. शेख मेहबूब, कॉ. शेख चुन्नू, शेख समीर, कॉ. सय्यद रफिक, कॉ. शेख मुस्‍तकीम, सय्यद फारुख, आसाराम घेणे, आदींनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

===Photopath===

270521\purusttam karva_img-20210527-wa0047_14.jpg

Web Title: In Majalgaon, MACP observed a black day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.