माजलगाव तालुका कृषी विभाग रिक्त पदांमुळे सलाईनवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 07:51 PM2019-08-01T19:51:46+5:302019-08-01T19:54:04+5:30
प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला अतोनात त्रास
- राजाभाऊ पास्टे
गंगामसला (बीड ) : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या पद रिक्ततेमुळे शेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
माजलगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील १३ जागांसह तालुक्यातील तीन कृषी मंडळामध्ये २९ जागा रिक्त आहेत. यात मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या ३ पैकी २ जागांचा तर कृषी सहाय्यकांच्या २२ जागांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. एकूण ६७ पदांपैकी २५ पदे भरलेली असून ४२ पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण ६७ पदांपैकी ४२ पदे रिक्त असल्यामुळे आता खरीप हंगाम आहे. मात्र कृषी विभाग सलाईनवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अशी आहेत रिक्त पदे
तालुका कृषी कार्यालय २२ विविध पदे, १३ पदे रिक्त आहेत, सहायक अधीक्षक १, कृषी सहायक १, कृषी पर्यवेक्षक १, लिपिक ३, अनुरेखक २, जीप चालक १, शिपाई ४, कृषी मंडळ माजलगाव १५ पदे मंजूर, रिक्त पदे ९, कृषी पर्यवेक्षक १, कृषी सहायक ८, कृषी मंडळ गंगामसला १५ पदे मंजूर, रिक्त पदे ८, कृषी अधिकारी १, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ५ रिक्त आहेत, कृषी मंडळ केसापुरी १५ पदे मंजूर, रिक्त पदे १२, कृषी अधिकारी १, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ९ जागा रिक्त आहेत.
६७ जागांना शासनाची मंजूरी
माजलगाव तालुका दुष्काळी असल्यामुळे येथील शेतकरी दृष्काळाशी नेहमी संघर्ष करीत आहे. या परिस्थितीत येथील कृषी विभाग मात्र सलाईनवर आहे. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी तालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह तीन कृषी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माजलगाव, गंगामसला, केसापुरी या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात एकूण ६७ जागांना शासनाची मंजूरी आहे. तालुका कार्यालयातील १३ व माजलगाव मंडळ ९, गंगामसला मंडळ ८, केसापुरी मंडळ १२ अशा एकूण ४२ जागांची आवश्यकता आहे. माजलगाव, गंगामसला मंडळासह सर्वाधिक जागा केसापुरी मंडळात रिक्त असल्याने त्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून, यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहवे लागत आहे. रिक्त जागांमुळे माजलगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील १३ जागांसह तालुक्यातील तीन कृषी मंडळात २९ जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त असल्यामुळे शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंग
तालुक्यात मंडळ कृषी अधिकाऱ्यांची ३ पदे असून गंगामसला व केसापुरी येथील पदे रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयात असलेले एकमेव सहायक अधीक्षकांचे पद देखील रिक्त आहे. तसेच लिपिकपदाच्या ५ जागा मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाने आणलेल्या नवीन योजनांची माहिती पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम असलेल्या कृषी सहाय्यकांच्या ३७ पदांपैकी २३ पदे रिक्त आहेत, त्यामुळे शासनाच्या कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचत नाही. शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे नेण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंग लागल्याची स्थिती तालुक्यात झालेली आहे. शेतकरी अनेक योजनांबाबात अनभिज्ञ आहेत. शासनाकडून नोकर भरती बंद असल्याचा फटका कृषी कार्यालयाला बसत आहे.
तीन मंडळांत ६७ जागा रिक्त
तालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह तीन कृषी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माजलगाव, गंगामसला, केसापुरी या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात ६७ जागांना शासनाची मंजुरी आहे. तालुका कार्यालयातील १३ व माजलगाव मंडळ ९, गंगामसला मंडळ ८, केसापुरी मंडळ १२ अशा एकूण ४२ जागांची आवश्यक आहे. माजलगाव, गंगामसला मंडळासह सर्वाधिक जागा केसापुरी मंडळात रिक्त असल्याने त्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून, यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.