माजलगावात प्रहारचे थाळी वाजवा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:35+5:302021-05-21T04:35:35+5:30
: केंद्र सरकारने उडीद, तूर, मुगाची आयात थांबवावी या मागणीसाठी तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती ...
: केंद्र सरकारने उडीद, तूर, मुगाची आयात थांबवावी या मागणीसाठी तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात थाळी वाजवू आंदोलन करण्यात आले. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी ताली व थाली बजाओ आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख गोपाळ पैंजणे, उपतालुका प्रमुख नितीन कांबळे, शहरप्रमुख मुस्ताक कुरेशी, तालुका संघटक अमर कान्हापूरकर, युवक शहराध्यक्ष अमोल ढगे, युवक तालुका प्रमुख संभाजी इदगे पाटील, सोशल मीडिया तालुकाप्रमुख आशोक अर्जुन आदी उपस्थित होते.
===Photopath===
200521\purusttam karva_img-20210520-wa0058_14.jpg