माजलगावच्या जय महेश कारखानाच्या बगँस डेपोला आग, 5 हजार टन बगँस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:28 PM2022-02-13T16:28:14+5:302022-02-13T16:28:32+5:30

माजलगाव- तालुक्यातील पवारवाडी येथे जय महेश शुगर्सच्या बगँस डेपोला रविवारी दुपारी  अचानक आग लागली. या आगीत 5 हजार मे. टन ...

Majalgaon's Jai Mahesh factory's bagan depot on fire, 5,000 tonnes of baganas burnt to ashes | माजलगावच्या जय महेश कारखानाच्या बगँस डेपोला आग, 5 हजार टन बगँस जळून खाक

माजलगावच्या जय महेश कारखानाच्या बगँस डेपोला आग, 5 हजार टन बगँस जळून खाक

Next

माजलगाव- तालुक्यातील पवारवाडी येथे जय महेश शुगर्सच्या बगँस डेपोला रविवारी दुपारी  अचानक आग लागली. या आगीत 5 हजार मे. टन बगँस जळुन खाक झाला.या यागीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे खाजगी तत्त्वावर चालू असलेल्या जय महेश शुगर्स या साखर कारखान्यातील बगँस डेपोला रविवारी दुपारी 12 वा.अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात धुरच धुर पसरला होता.ही आग विजवण्यासाठी या कारखान्याच्या यंत्रणेसह पाथरी ,बीड ,सोळंके कारखाना ,माजलगाव नगर पालिकेच्या अग्निशमन दलामुळे ही आग तीन तासात अटोक्यात आली.

या आगीत 5 हजार मे.टन बगँस जळुन खाक झाला. यामुळे कारखान्याचे 50 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती या कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांनी दिली. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाली असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Web Title: Majalgaon's Jai Mahesh factory's bagan depot on fire, 5,000 tonnes of baganas burnt to ashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.