वाळू माफियांवर मोठी कारवाई; राक्षसभुवन येथे तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 03:52 PM2022-03-03T15:52:25+5:302022-03-03T15:52:42+5:30

पोलिसांनी दोन हायवा व एक जे.सी.बी असा तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला.

Major crackdown on sand mafias; Property worth Rs 1 crore seized at Rakshasabhuvan | वाळू माफियांवर मोठी कारवाई; राक्षसभुवन येथे तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त

वाळू माफियांवर मोठी कारवाई; राक्षसभुवन येथे तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त

Next

गेवराई (बीड) : तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज सकाळी गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली. अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने कारवाई करत येथून जेसीबी व दोन हायवा असा तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिस अधिक्षक आर.राजा यांना खबऱ्यामार्फत तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. यावरून सकाळी आठ वाजेच्या सुमारास आर. राजा यांच्या पथकाने राक्षसभुवन येथे धाड टाकली. यावेळी गोदापात्रातून वाळूचे अवैध उत्खनन सुरू होते. 

पोलिसांनी दोन हायवा व एक जे.सी.बी असा तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एसपी प्रमुख एपीआय गणेश धोक्रट, पोलीस नाईक अन्वर शेख, गोविंद काळे, सचिन पाटेकर तसेच चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि भास्कर नवले, गाडेकर सह अनेकांनी केली.
जप्त वाहने चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Major crackdown on sand mafias; Property worth Rs 1 crore seized at Rakshasabhuvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.