दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, उपचार व लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:40+5:302021-05-11T04:35:40+5:30
यासंदर्भात त्यांनी ८ मे २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. बीड यांना मेलद्वारे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. ...
यासंदर्भात त्यांनी ८ मे २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. बीड यांना मेलद्वारे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. सध्या कोविड १९ रुग्णांचे स्वॅब नमुने घेणे व १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण तसेच कोविड १९ रुग्णांचे उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींची प्रतिकारशक्ती सामान्य व्यक्तींच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना कोरोना विषाणूचा अधिकचा धोका असतो, तसेच त्यांच्या दिव्यांगत्वामुळे त्यांना चलनवलनाची अर्थात प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेता बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोना बाधित असल्यावरचे उपचार; तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात येऊन त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. याबाबत ३ मे २०२१ रोजी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला असून, त्याची अंमलबजावणी तत्काळ जिल्ह्यातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर करून कार्यवाही व्हावी, असे राजेंद्र लाड यांनी निवेदनात म्हटले आहे.