प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:50 AM2019-06-30T00:50:07+5:302019-06-30T00:50:41+5:30

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

Make strict strict enforcement of plastic ban | प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी

प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी

Next

अंबाजोगाई : राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
मागील २४ मे पासून येथील पर्यावरण प्रेमी नागरिक बुट्टेनाथ-नागनाथ परिसरातील वाण-जयवंती नदीत प्लास्टिकमुक्त अभियान राबवित आहेत. या मोहिमेत रोज कमीत कमी एक टन प्लास्टिक व घनकचरा काढला जात आहे. बुट्टेनाथ नागनाथ मुकुंदराज भागातील समृद्ध जैवविविधता आपल्या शहरातील अनिर्बंध प्लास्टिकचा वापर व प्लास्टिक कचरा, घनकचरा यामुळे धोक्यात आलेले आहे. शहरामध्ये कचरा जाळण्याचे प्रचंड प्रमाण असून त्याबाबत घनकचरा व्यवस्थापन नियमन अंतर्गत कडक दंडात्मक कारवाई करावी व अंबाजोगाई शहर प्लास्टिक व धूरमुक्त मुक्त करावे. अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी प्रा. अरूंधती पाटील, डॉ. नितीन चाटे, प्रवीण चोपडा, दत्ता देवकते, विजय रापतवार, महेश वेदपाठक, अनंत मलवाड, सत्येंदू रापतवार, आशिष राठोड, दिनेश शिंदे, डॉ. अविनाश मुंडे, अजय रापतवार, अ‍ॅड. ढेले, सुमेधा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Make strict strict enforcement of plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.