मलकापूर - मांडवा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:48 AM2018-03-31T00:48:01+5:302018-03-31T00:48:01+5:30

परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या वाहनधारकांना रस्त्यावरुन येता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.

Malkapur - Mandhwa road has been suspended for three months | मलकापूर - मांडवा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून ठप्प

मलकापूर - मांडवा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून ठप्प

Next
ठळक मुद्देउपकार्यकारी अभियंता अंबाजोगाईहून हाकतात परळीचा कारभार; ७९ लाख रुपयांचा निधी नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या वाहनधारकांना रस्त्यावरुन येता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम खाजगी एजन्सी देण्यात आले आहे. मलकापूर ते मांडवा रोडवर झालेले अर्धवट कामही दर्जेदार नाही. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उर्वरित कामही केले नाही, असा आरोप मलकापूर येथील महादेव फुलचंद गीत्ते यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कार्यालय परळीच्या शिवाजी चौकाजवळच इमारतीत आहे. परंतु याठिकाणी उपकार्यकारी अभियंता कधी आलेले दिसतच नाहीत. उपकार्यकारी अभियंता काकड हे अंबाजोगाई येथूनच कारभार हाकतात. त्यामुळे परळीतील कामे वेळेवर होत नसून दर्जेदारही होत नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

काम पुर्ण करण्यासाठी एजन्सीला नोटीस - काकडे
यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड म्हणाले की, मलकापूर ते मांडवा रस्त्याचे काम पूर्ण करावे, यासाठी संबंधित एजन्सीला नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात हे काम सुरु करण्यात येईल. अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात परळीच्या उपविभागाचे काम असते. त्यामुळे आपण काही दिवस परळीत तर काही दिवस अंबाजोगाईत असतो, असे स्पष्टीकरण एस. बी. काकडे यांनी दिले आहे.

Web Title: Malkapur - Mandhwa road has been suspended for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.