आरोग्य विभागातील गैरव्यवहार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:22+5:302021-08-24T04:38:22+5:30

बीड आरोग्य विभाग सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती घोटाळा, रेमडेसिविर इंजेक्शनचा विषय मार्गी लागण्यापूर्वीच प्रकल्प प्रेरणा विभागाने ...

Malpractice in the health department; Fasting in front of the Collector's Office | आरोग्य विभागातील गैरव्यवहार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

आरोग्य विभागातील गैरव्यवहार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Next

बीड आरोग्य विभाग सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती घोटाळा, रेमडेसिविर इंजेक्शनचा विषय मार्गी लागण्यापूर्वीच प्रकल्प प्रेरणा विभागाने नवा वाद केला आहे. या विभागाने मागील तीन वर्षांत ३८८ पैकी केवळ ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेट दिली. तसेच काही ठिकाणी समुपदेशन कार्यक्रम घेतले. यासाठी तब्बल १२ लाख ६३ हजार रुपयांची उधळपट्टी करीत शेतकरी कुटुंबांच्या भावनांशी खेळ मांडल्याचे उघड झाले होते. या सर्व खर्चावर मानसोपचार तज्ज्ञ तथा प्रकल्प प्रेरणाचे प्रमुख डॉ. मोगले यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. हा सर्व मुद्दा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यावर डॉ. गणेश ढवळे यांनी या मुद्द्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे. आता यात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

..

मोगलेंची सेवा वादग्रस्त?

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुदाम मोगले यांनी शासकीय आरोग्य संस्थेत रुग्णसेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर ७० हजार रुपये वेतन देऊन घेतले. प्रकल्प प्रेरणा विभागाचे प्रमुखही केले. परंतु आतापर्यंत त्यांच्या कामाबद्दल नेहमीच तक्रारी आहेत. ओपीडीत न बसणे, शेतकरी कुटुंबांना कागदोपत्री मार्गदर्शन करण्याचे प्रकार त्यांनी केल्याचे उघड झालेले आहे. याच विभागातील इतर कर्मचारीही त्यांना सहकार्य करीत असून, त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.

230821\23_2_bed_20_23082021_14.jpeg

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकत्ते डॉ. गणेश ढवळे व इतर.

Web Title: Malpractice in the health department; Fasting in front of the Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.