ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:11 PM2022-02-16T17:11:07+5:302022-02-16T17:11:44+5:30

ओळख असल्याचा बहाणा करत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत लुटायचा

Man arrested for robbing relatives of patients In Beed | ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत

ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत

Next

बीड: हातचलाखी करुन रुग्णांच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या भामट्यास शिवाजीनगर पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोजी अटक केली. यापूर्वीही त्याने अनेकांना फसविल्याची माहिती समोर आली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.गुलाब दिगंबर बनसोडे (४०,रा. राडी तांडा ता.अंबाजोगाई, हमु.जुनी भाजी मंडई, बीड) असे त्या आराेपीचे नाव आहे. 

१५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील एका खासगी एमआरआय सेंटरवर पत्नीच्या तपासणीसाठी एक व्यक्ती आला होता. तपासणीनंतर बाहेर पडल्यावर सदरील व्यक्तीला गाठून गुलाब बनसोडे याने त्यांच्याशी ओळख असल्याचा बहाणा करत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदरील व्यक्तीही त्यांच्या बोलण्यास भाळला. हातचलाखीने नंतर गुलाब बनसोडे याने त्यांच्याकडील १५ हजार रुपये काढून घेत तेथून पोबारा केला. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्तीेन आरडाओरड करत रडायला सुरुवात केली. 

यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस अंमलदार मोहसीन शेख हे दुचाकीवरुन गस्त घालत होते. त्यांनी विचारपूस केल्यावर घडला प्रकार समोर आला. त्यानंतर खासगी दवाखान्यातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात संशयित गुलाब बनसोडे आढळला. त्यानंतर शेख मोहसीन यांनी मोठ्या शिताफीने गुलाब बनसोडे यास पकडून चौकशीला सुरुवात केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर त्याच्यावरील संशय बळावला. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले, तेथे पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने पत्नीकडे ठेवलेले १५ हजार रुपये काढून दिले. दरम्यान, सदरील व्यक्तीने तक्रार दिली नाही. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये एका निवृत्त कर्मचाऱ्रूास गुलाब बनसाेडे याने बँकेतून पैसे काढून घरी परतताना लुटले. या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली.

चार दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, गुलाब बनसोडेला १६ रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडे कसून चौकशी सुरु असून त्याने अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. अधिक तपास सुरु असल्याचे हवालदार एन.ए.काळे यांनी सांगितले.

Web Title: Man arrested for robbing relatives of patients In Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.