‘मानवलोक’कडून ५८ जिल्हा परिषद शाळांना खेळणीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:05+5:302021-09-21T04:37:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : येथील मानवलोक संस्थेच्या वतीने बीड जिल्हा परिषद शाळांना खेळणीचे वाटप करण्यात आले. टॉयबँकेद्वारे प्रत्येक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील मानवलोक संस्थेच्या वतीने बीड जिल्हा परिषद शाळांना खेळणीचे वाटप करण्यात आले. टॉयबँकेद्वारे प्रत्येक मुलाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे.
मानवलोक संस्था २०१६ पासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, ग्रामीण मुलांना हसत खेळत शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणणे, मुलांमधील सुप्तगुणाला वाव देण्यासाठी टॉय बँक उपक्रम राबवित आहे. खेळ हे एक शक्तिशाली साधन आहे. जे मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रभावी माध्यम आहे. टॉयबँक प्रत्येक मुलाला निरोगी खेळाद्वारे सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. या उपक्रमाच्या माध्यमातून ब्लॉक, अल्फाबेटिक, पझल, जनरल, न्यूम्यारिक, आउटडोर गेम्स ग्रामपंचायत व मुख्याध्यापक यांच्या मागणीनुसार देण्यात येते. या कार्यास टॉयबँक संस्था (मुंबई) खेळणी देऊन सहकार्य करते. एका शाळेला विद्यार्थी संख्येप्रमाणे अंदाजे वीस ते तीस हजारांची खेळणी दरवर्षी देण्यात येते.
कार्यक्रमास टॉयबँकेचे पंकजभाई बाविसी, मानवलोकचे अनिकेत लोहिया, गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोनसीकर, चंदन कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विनायक गडेकर यांनी केले. त्यांना सतीश कांबळे, माणिक कुकडे, गणेश साखरे, लक्ष्मीकांत धुमाळ, त्र्यंबक वडकर यांनी सहकार्य केले.
180921\3530img-20210918-wa0008.jpg
मानवलोक कडुन शाळांना खेळणी वाटप