मांडवजाळी- बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:22+5:302021-08-24T04:37:22+5:30

- A बीड : बीड तालुक्यातील पाली जिल्हा परिषद गटातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत बोरवन वस्तीवर जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याने ...

Mandavajali- Borwan Vasti Road for villagers | मांडवजाळी- बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे साकडे

मांडवजाळी- बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे साकडे

googlenewsNext

- A

बीड : बीड तालुक्यातील पाली जिल्हा परिषद गटातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत बोरवन वस्तीवर जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याने वस्तीवरील ग्रामस्थांना जीव धोक्यात टाकून बिंदूसरा नदी ओलांडून पायपीट करावी लागते. हा रस्ता करून ग्रामस्थांना रहदारीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे केली आहे.

शुक्रवारी बोरवन वस्ती येथील राम बहीरवाळ यांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी राजेंद्र मस्के बोरवन वस्ती येथे गेले होते. रस्ता नसल्यामुळे मोटारसायकलवरून बिंदूसरा नदीतून मार्ग काढत त्यांनी वस्ती गाठली. यावेळी गावकऱ्यांनी रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले. अडीचशे ते तीनशे लोकसंख्या असलेली ही वस्ती. रस्ता नसल्यामुळे येथील वयोवृद्ध गावकरी, शाळकरी मुले व महिलांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात हालअपेष्टा जास्त सहन कराव्या लागतात. तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी मोठे संकट उभे राहते. पायपीट करून आणि नदी ओलांडल्याशिवाय वस्तीवरून ये-जा करता येत नाही.

लिंबा गणेश जिल्हा परिषद गटातील लोकांच्या गरजेनुसार अनेक छोट्या-मोठ्या रस्त्यांना प्राधान्य देऊन रस्त्याची कामे राजेंद्र मस्के यांनी पूर्ण केली आहेत. बीड वरवटी-भाळवणी-लिंबा गणेश हा रस्ता पूर्ण केल्याने डोंगरपट्ट्यातील साधारण पंधरा गावांना वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ता उपलब्ध करून दिल्याने या परिसरातील ग्रामस्थ समाधानी आहेत. याच पद्धतीने बोरवन वस्ती रस्त्याची समस्या राजेंद्र मस्के यांनी सोडवावी, अशी भावना लोकांनी व्यक्त केली.

साधारण एक किलोमीटर लांबीचा हा रस्ता केवळ पाठपुरावा नसल्याने दुर्लक्षित राहिला आहे. येथील गावकऱ्यांची समस्या पूर्ण करण्यासाठी आपण जिल्हा परिषद अथवा शासनाच्या इतर योजनेत हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी गावकऱ्यांना दिला आहे. यावेळी राम बहीरवाळ, शहादेव महाराज बहीरवाळ, त्रिंबक नैराळे, राधा किसन कदम, रवींद्र कळसाने, रामदास कदम, गजानन बहीरवाळ, महेश बहीरवाळ, बद्रीनाथ जटाळ आदी उपस्थित होते.

200821\13225756063520_2_bed_24_20082021_14.jpeg

मांडवजाळी- बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे साकडे

Web Title: Mandavajali- Borwan Vasti Road for villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.