मनेंद्र बागलानेंकडे आरोग्य संघटनेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:18+5:302021-07-17T04:26:18+5:30

जिल्हाध्यक्षपदावर वर्णी : बीडमध्ये राज्यस्तरीय बैठकीत कार्यकारिणीची निवड बीड : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची ...

Manendra Baglan has the responsibility of health organization | मनेंद्र बागलानेंकडे आरोग्य संघटनेची जबाबदारी

मनेंद्र बागलानेंकडे आरोग्य संघटनेची जबाबदारी

Next

जिल्हाध्यक्षपदावर वर्णी : बीडमध्ये राज्यस्तरीय बैठकीत कार्यकारिणीची निवड

बीड : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मनेंद्र बागलाने यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. बीडमध्ये नुकतीच राज्यस्तरीय बैठक पार पडली. यात जिल्ह्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. परंतु, बागलाने यांच्या नावावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले.

आरोग्य विभागातील प्रत्येक संघटनेला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माेठा मान असतो. त्यामुळे अध्यक्ष व इतर पदे मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. अशीच काहीशी परिस्थिती आरोग्य कर्मचारी संघटनेबाबत झाली होती. बीडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीपूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. परंतु, सर्वानुमते मनेंद्र बागलाने यांची निवड करण्यात आली. त्यांच्यासह जिल्हा सचिव म्हणून शेख साजीद, किशोर जाधव, विजय गायकवाड, भरत नागरगोजे, वसंत सानप, अंत्राम, कल्पना गायकवाड, सुनीता शेलार, मनोज वाघमारे यांच्याही निवडी विविध पदांवर केल्या आहेत. बुधवारी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. डॉ. पवार यांनीही सर्वांचे स्वागत केले.

140721\174314_2_bed_12_14072021_14.jpeg

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांना नवनियूक्त जिल्हाध्यक्ष मनेंद्र बागलाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटून निवडीचे पत्र दिले.

Web Title: Manendra Baglan has the responsibility of health organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.