बाजारात आंब्याची आवक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:28+5:302021-06-05T04:24:28+5:30
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यासाठी टपरी चालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देण्याची गरज ...
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यासाठी टपरी चालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देण्याची गरज आहे. मात्र अनेक विक्रेते काचेच्या ग्लासात चहा देऊ लागले आहेत. यामुळे संसर्ग उद्भवू शकतो. यासाठी कागदी ग्लासाचा वापर प्राधान्याने करावा. अशी मागणी चहाप्रेमींमधून आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठड्यांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्यूज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे.
पांदण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेताना देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.