आईच्या अस्थीवर लावले आंब्याचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:31 AM2021-05-17T04:31:58+5:302021-05-17T04:31:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : आईची आठवण कायमस्वरूपी जोपासण्यासाठी त्यांच्या अस्थी व राखेवर आंब्याचे झाड लावले. आईची आठवण व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : आईची आठवण कायमस्वरूपी जोपासण्यासाठी त्यांच्या अस्थी व राखेवर आंब्याचे झाड लावले. आईची आठवण व त्यांचा वृक्ष लागवडीचा अनोखा वारसा आरसुळ कुटुंबीयांनी जोपासला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील सुगावच्या रहिवासी विमलबाई आरसुळ यांचे काही दिवसांपूर्वी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी अस्थी इतरत्र न टाकता, त्या अस्थी एका खड्ड्यात टाकून त्यावर आंब्याचे झाड त्यांच्या स्मरणार्थ लावले आहे. आईची आठवण व निसर्गाचा समतोल राखण्याचे काम आरसुळ कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
सुगावच्या रहिवासी विमलबाई आरसुळ या निसर्गप्रेमी होत्या. त्यांनी दुष्काळात डोक्यावर पाणी आणून परसबाग जोपासली होती. परसबागेत त्यांनी विविध देशी जातींचे वृक्ष, फळझाडे, भाजीपाला व फुलांची बाग फुलवली होती. अनेक वृक्ष फळे, फुलांनी बहरले आहेत. त्यांनी कुटुंबासाठी गावरान ताजा भाजीपाला व विविध झाडे लावून ताज्या ऑक्सिजनची सोय केली होती. त्यामुळे त्यांचे कुटुंब व त्या स्वतः निरोगी होत्या. विमलबाई आरसुळ या निसर्गप्रेमी, धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या आजारी असल्याने त्यांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नगरपालिका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
.....
प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
प्रत्येकाने आई, वडील किंवा नातेवाईकांच्या स्मरणार्थ एक झाड लावले तर भविष्यात कोणाचा ऑक्सिजनमुळे प्राण जाणार नाही. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक झाड लावण्याचा सल्ला बीएस्सी नर्सिंगची विद्यार्थीनी वैष्णवी आरसुळ हिने तरुणींना दिला आहे.
===Photopath===
160521\avinash mudegaonkar_img-20210516-wa0036_14.jpg